Dog Bite first aid : कुत्रा चावल्यावर काय करावं, १५ मिनिटं का महत्त्वाची आहेत? file photo
फीचर्स

Dog Bite first aid : कुत्रा चावल्यावर काय करावं, १५ मिनिटं का महत्त्वाची आहेत?

ज्या व्यक्तीला कुत्रा चावला आहे त्‍या व्यक्तीने शक्य तितक्या लवकर पुढील उपाय करावेत.

पुढारी वृत्तसेवा

What should be done if a dog bites, and why are the first 15 minutes important?

पुढारी ऑनलाईन : सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा उपाय म्हणजे चावलेल्या सर्व जखमा कोणत्याही ब्रँडच्या साबणाने आणि वाहत्या पाण्याने १५ मिनिटांपर्यंत पूर्णपणे धुऊन स्वच्छ कराव्यात. लहान मुलांच्या बाबतीत, त्यांच्या शरीरावर चाव्याची कोणतीही जखम राहिलेली नाही ना, याची पालकांनी संपूर्ण शरीराची काळजीपूर्वक तपासणी करावी.

अगदी किरकोळ ओरखड्यांकडेही दुर्लक्ष करू नये. जागतिक आरोग्य संघटना (WHO) रेबीजचा प्रतिबंध करण्यासाठी जखमांची पूर्णपणे स्वच्छता करणे हा महत्त्वाचा उपाय असल्याचे स्पष्टपणे सांगते.

त्यानंतर सर्व जखमांवर घरामध्ये सामान्यतः उपलब्ध असलेले कोणतेही जंतुनाशक (अँटिसेप्टिक) हलक्या हाताने लावावे. हळद, लाल तिखट, चहा किंवा कॉफी पावडर, वनस्पतींचे रस किंवा त्यासारखे कोणतेही पदार्थ जखमेवर लावू नयेत, कारण यामुळे रेबीजचा संसर्ग रोखला जात नाही. जखमेला गरम वस्तूने चटके देणे किंवा भाजणे ही पद्धतदेखील आता मध्ययुगीन पद्धत मानली जाते असा उपाय करू नये.

कुत्रा किंवा मांजर चावल्यामुळे झालेल्या जखमांना तात्काळ टाके घालू नयेत. मात्र रक्तस्राव थांबवण्यासाठी टाके घालणे अपरिहार्य असल्यास, जखमेमध्ये रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (Rabies Immunoglobulin) किंवा रेबीज मोनोक्लोनल अँटीबॉडी (Rabies Monoclonal Antibody) पूर्णपणे टोचून दिल्यानंतरच टाके घालावेत.

रेबीजची लस

आधुनिक रेबीज लसींमध्ये प्युरिफाइड व्हेरो सेल रेबीज लस (Purified Vero Cell Rabies Vaccine) आणि प्युरिफाइड चिक एम्ब्रियो सेल रेबीज लस (Purified Chick Embryo Cell Rabies Vaccine) यांचा समावेश होतो. ही लस प्रौढांना खांद्याच्या भागात, तर अर्भक आणि लहान मुलांना मांडीच्या बाजूच्या (अॅन्टेरो-लॅटरल भागात) दिली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT