पुढारी ऑनलाईन डेस्क - लुईझियानाचे मार्डी ग्रास सेलिब्रेशन जगभर प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये येथील संस्कृती आणि परंपरा, रंगीत परेड्स, कार्निव्हल, हटके पोशाख, आणि खाद्यपदार्थांचा अनोखा अनुभव मिळतो. फ्रान्समधील पारंपरिक 'बौफ ग्रा' रिव्हेरीपासून सुरू झालेला हा उत्सव वसाहतींमध्ये लोकप्रिय झाला आणि त्याचा प्रवास एका भव्य फेस्टिव्हलपर्यंत पोहोचला.
१६९९ मध्ये फ्रेंच-कॅनेडियन संशोधक जीन-बॅप्टिस्ट ले मोयने डी बिएनविले यांनी न्यू ऑर्लिन्सजवळील एका छोट्या भूभागाचे नाव ‘मार्डी ग्रास पॉइंट’ ठेवले आणि त्याच परिसरात या सणाची सुरुवात केली. १७३० मध्ये मार्डी ग्रास न्यू ऑर्लिन्सच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला, ज्यामध्ये एलिगंट बॉल्स आणि मास्क्ड प्रोसेशन्सचा समावेश होता.
२०२५ साठी कार्निव्हल सीझन ६ जानेवारीला सुरू होऊन ४ मार्च रोजी फॅट ट्यूसडे किंवा मार्डी ग्रास डेने सांगता होईल. या काळात लुईझियाना एकत्र येऊन वर्षातील सगळ्यात आनंददायक दिवस साजरा करते.
स्लाइडेल
न्यू ऑर्लिन्सपासून काही मैलांवर स्लाइडेल कॅनलमधून होणारी 'क्रेवे ऑफ बिल्ज' बोट परेड पाहता येते. सजवलेल्या बोटी, क्रेवे सदस्यांनी टाकलेले बीड्स आणि कार्निव्हल ट्रेझर्स यामुळे कुटुंबांना प्रचंड आनंद मिळतो.
जेफरसन पॅरिश
येथील ‘फॅमिली ग्रास’ हा मोफत कार्यक्रम कुटुंबांसाठी खास आहे. येथे तुम्हाला मार्डी ग्रास परेड्सचा थाट, स्थानिक खाद्यपदार्थ, कला, मुलांसाठी किड्स कोर्ट आणि प्रसिद्ध कलाकारांची मैफिलींचा आनंद घेता येईल.
न्यू ऑर्लिन्स
फ्रेंच क्वार्टरमध्ये होणारी 'बार्कस क्रेवे' ही कुत्र्यांसाठी खास परेड प्राणीप्रेमींसाठी पर्वणी आहे. कुत्रे आणि त्यांचे मालक अतरंगी पोशाखांत सजून या उत्सवात रंग भरतात.
लाफायते
लाफायतेमध्ये मुलांची वार्षिक परेड आणि क्रेवे ऑफ बोनापार्ट अशा सोहळ्यांमुळे कुटुंबांसाठी हा उत्सव खास ठरतो. येथे परंपरागत 'कुरिर दी मार्डी ग्रास' देखील पाहायला मिळतो.
युनिस
कजुन परंपरेचा उत्सव साजरा करणारे युनिस हे छोटेसे शहर लहान मुलांसाठी खास आहे. येथे वेगवेगळ्या वयोगटांनुसार मुलांसाठी कार्यक्रम आणि परेड आयोजित केल्या जातात.
बॅटन
‘मिस्टिक क्रेवे ऑफ मट्स’ हा विनोदी परेड कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. येथे कुत्र्यांचे पिल्ले आकर्षक पोशाखांत दिसतात.
लेक चार्ल्स
लेक चार्ल्स येथे ‘क्रेवे ऑफ बार्कस’ पाळीव प्राण्यांसाठी खास परेड आहे, ज्यामुळे हा उत्सव आणखी मजेदार होतो.
अलेक्झांड्रिया
येथील ‘चिल्ड्रन परेड’ ही मुलांसाठी खास असते, जिथे मिस टीन लुईझियाना ग्रँड मार्शल असते. रंगीबेरंगी फ्लोट्स, मार्चिंग बँड्स, आणि नृत्य यात संपूर्ण कुटुंब रमून जाते.
नॅचिटोचेस
संध्याकाळी होणाऱ्या 'क्रेवे ऑफ डायोनिसॉस' परेडमुळे नॅचिटोचेस लहान मुलांसाठी खास ठरतो. या परेडमध्ये आकर्षक प्रकाशयोजना आणि कुटुंबांसाठी भरपूर बीड्स पाहायला मिळतात.
मनरो
‘क्रेवे ऑफ जानुस’ परेडमध्ये भव्य फ्लोट्स आणि रंगीत स्कल्पचर्स पाहता येतात. यामध्ये मुलांसाठी खास परेडही असते, ज्यामध्ये सजवलेल्या वॅगन्स आणि पोशाखधारी मुलांचा सहभाग असतो.
‘क्रेवे ऑफ बार्कस’ आणि ‘मिऑक्स परेड’ कुत्र्यांच्या पिल्लांसाठी आयोजित परेड आहेत. यामुळे कुटुंबासाठी हा उत्सव अधिक गोडसर होतो.
लुईझियाना मार्डी ग्रास फेस्टिव्हलमध्ये प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा वेगळा अनुभव आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबासह हा उत्सव साजरा करण्यासाठी हा परिपूर्ण पर्याय आहे!