Total Logistics company fine 200 crore pudhari
फीचर्स

Total Logistics company fine 200 crore: गरोदर महिलेला वर्क फ्रॉम होम नाकारणाऱ्या कंपनीला २०० कोटी रूपयांचा दंड

Anirudha Sankpal

Total Logistics company fine 200 crore: टोटल लॉजेस्टिक कंपनीतील एक महिला कर्मचारी ही हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये होती. तिला डॉक्टरांनी प्रवास आणि दगदग टाळण्याचा सल्ला दिला होता. तिनं ऑफिसकडे वर्क फ्रॉम होम मागितलं होतं मात्र कंपनीनं नकार दिल्यानं तिला कार्यालयात येऊन काम करावं लागलं. अखेर दुर्दैवी घटना घडलीच... डिलिव्हरीनंतर तिचं बाळ एका दिवसात दगावलं. यानंतर महिलेनं कंपनीवर दावा ठोकला होता. त्या अतंर्गत आता या कंपनीला त्या महिलेला २०० कोटी रूपये दंड म्हणून द्यायचे आहेत.

फेब्रुवारी २०२१ मधील घटना

हे प्रकरण २०२१ मधले आहे अमेरिकेतील ओहायो राज्यात चेल्सी वॉल्श नावाची एक महिला राहते. ती याच राज्यातील टोटल क्वालिटी लॉजिस्टिक कंपनीत काम करत होती. हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये असल्यामुळं डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता. तिनं कपंनीकडे १५ फेब्रुवारी रोजी वर्क फ्रॉम मिळावं अशी मागणी केली होती. मात्र कंपनीने नकार देत ऑफिसमधून काम करा दिंवा बिनपगारी सुट्टी टाका असं सांगितलं होतं.

लेबर पेन सुरू झाले अन्...

बिना वेतन सुट्टी म्हणजे इनकम आणि हेल्थ कव्हरेज दोन्हीचं नुकसान होणार होतं. चेल्सीला हे नको होतं. त्यामुळं चेल्सीनं २२ फेब्रुवारी पासून ऑफिसमध्ये जाऊन काम सुरू केलं. २४ फेब्रुवारी रोजी तिला लेबर पेन सुरू झाले. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र या मुलीचा काही तासातच मृत्यू झाला.

अखेर द्यावी लागली नुकसान भरपाई

ही एक प्री मॅच्युअर डिलिव्हरी होती. १८ आठवड्याच्या आत ही डिलिव्हरी झाली होती. त्यामुळं त्यांनी कंपनीवर केस ठोकली. तिच्या मुलीच्या मृत्यूला कंपनी जबाबदार असल्याचं चेल्सीनं दावा केला होता. चेल्सीनं कोर्टातील आपली लढाई जिंकली. कोर्टाने कंपनीला चेल्सीला २५ मिलियन डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्यानंतर ही रक्कम २२.५ मिलियन डॉलर इतकी निश्चित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT