Hanuman Jayanti 2025 : बलोपासना करणाऱ्यांची अधिष्ठात्री देवता म्हणून हनुमानाकडे पाहिले जाते. परचक्राच्या काळातसंघटनशक्ती आणि उपासना वाढवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मारुतीरायाची मंदिरे अनेक ठिकाणी उभारली. यामुळे बलोपासनेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी या मंदिराची स्थापना केली गेली आहे.
शहापूर : अकरा मारुतीं पैकी सर्वात पहिला मारुती म्हणून या मारुतीची ओळख आहे. कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिरातील मारुतीची मूर्ती काहीशी उग्र वाटणारी आहे. 1566 साली या मारुतीची स्थापना समर्थ रामदास यांनी केली.
मसूर : समर्थांचा लाडका शिष्य कल्याण आणि समर्थांची भेट याच गावात झाल्याचे सांगितले जाते. येथील मारुतीच्या मूर्तीला महारुद्र मारुती म्हणतात. या मूर्तीच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची चित्रे काढली आहेत. या मंदिरातील अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे.
चाफळ : चाफळ हे श्री समर्थ रामदास यांच्या जीवनातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक. अकरा मारुतीच्या स्थानांपैकी चाफळ यासाठी प्रसिद्ध आहे कि जिथे समर्थांनी दोन मारुती स्थापन केले. त्यापैकी एक आहे दासमारुती. अत्यंत मजबूत बांधणीचे हे मंदिर श्रीराम भक्तीत लिन असलेल्या मारुतीची मूर्ती दर्शवितो.
चाफळ : चाफळमधील दुसरी मारुतीची मूर्ती म्हणजे प्रताप मारुती. वीररसाचे दर्शन घडवणाऱ्या या मारुतीची मूर्ती जवळपास 8 फुट उंच आहे. दृष्टांचा संहार करणाऱ्या आवेशात इथे मारुतीची मूर्ती आहे.
उंब्रज : कराड येथे असलेली ही दोन फुटाची मारुतीची मूर्ती लक्षवेधी आहे. समर्थ रामदास इथे स्नानाला जात असत अशी आख्यायिका सांगितली जाते. 1571 साली या मारुतीची स्थापना झाली आहे. पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती बाल मारुती रूपातील आहे.
माजगाव : चाफळच्या रामाकडे चेहरा असलेली ही मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावच्या वेशीवर असलेल्या दगडाला लोक मारुती समजत असत. पण समर्थांनी स्वत: त्या मूर्तीवर मारुतीराया चितारले आणि त्याची प्रतिष्ठापना केली.
बहे बोरगाव : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे बोरगाव येथे असलेली मारुतीच्या मूर्तीबाबत असलेली आख्यायिका प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या पुराचा संध्या करत असलेल्या श्रीरामांना त्रास होऊ नये यासाठी मारूतीने दोन्ही बाहू आडवून नदीचा प्रवाह रोखून धरला. यामुळे तिथे एक बेट तयार झाले. यालाच बहे बोरगावचे बेट म्हणतात. या ठिकाणी असलेल्या डोहातून सध्याच्या मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती संपडल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे दोन्ही बाहू पाणी अडवण्याच्या आविर्भावात असलेली ही मूर्ती आहे.
मनपाडळे : अकरा मारूतींपैकी हा आठवा मारुती. नदीकाठावरच्या या मंदिरात मारुतीची सुबक मूर्ती आहे. या ठिकाणापासून दख्खनचा राजा ज्योतिबा हे देवस्थान आणि पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ जवळच आहे.
पारगाव : बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती अशी ओळख या मारुतीची आहे. लहान मुलाची आहे अशी वाटावी ही मूर्ती आहे. असे म्हणतात 11 मारुतींपैकी समर्थांनी सगळ्यात शेवटी या मारूतीची स्थापना केली.
शिराळा : पश्चिम महाराष्ट्रात नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेले शिराळा मारुतीसाठीही प्रसिद्ध आहे. शिराळ्याच्या एसटी स्टँडजवळ असलेल्या या मंदिरात मारुतीची सात फूटी मूर्ती आहे.