दूरसंचार कंपन्या ‘या’ कालावधीत सुरु करणार 5G सेवा 
तंत्रज्ञान

दूरसंचार कंपन्या ‘या’ कालावधीत सुरु करणार 5G सेवा

दूरसंचार कंपन्या ‘या’ कालावधीत सुरु करणार 5G सेवा

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात शनिवारी (दि.1) पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते 5-G सेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात देशातील तेरा महानगरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 5G ​​नेटवर्कमुळे विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये बदल होतील. पण दूरसंचार कंपन्याचे प्लॅन नेमके काय असणार आहेत याबद्दल तुम्हाला प्रश्न निर्माण होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी.

दूरसंचार कंपन्या एअरटेल (Airtel), आणि जिओ (Jio), लवकरच भारतात त्यांचे 5G प्लॅन लॉन्च करणार आहेत, तर वोडाफोन (Vodafone) आयडियाने (Idea) लवकरच करतील अपेक्षित आहे. भारतीय दूरसंचारमधील या तिन्ही कंपन्‍यांनी देशात 5G सेवा कशी आणण्याची योजना आखली आहे.

5G : रिलायन्स जिओ (Reliance Jeo)

रिलायन्स जिओ (Reliance Jeo) 22 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपर्यंत भारतात 5G योजना आणणार आहे. ही सेवा सुरुवातीला चार शहरांमध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. रिलायन्स जिओने असेही जाहीर केले आहे की, देशातील इतर शहरांनाही डिसेंबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने 5G सेवांचा लाभ मिळेल.

भारती एअरटेल (Airtel)

एअरटेलने (Airtel) घोषणा केली आहे की, टेलिकॉम ऑपरेटर २ ऑक्‍टाेबरपासून आठ भारतीय शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. एअरटेलने ही कोणती आठ शहरे आहेत हे स्पष्ट केलेले नाही. मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरांचा समावेश अपेक्षित आहे. एअरटेलने असेही जाहीर केले आहे की ते मार्च 2024 पर्यंत संपूर्ण भारतात 5G सेवा आणणार आहे.

व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea)

व्होडाफोन आयडियाने आतापर्यंत 5G संबंधित कोणत्याही घडामोडींची घोषणा केली नाही. असे दिसते आहे की, व्होडाफोन आयडिया ग्राहकांना 5G ची थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT