WhatsApp Scheduled Messages Feature Pudhari
तंत्रज्ञान

WhatsApp New Feature: फोन बंद, इंटरनेट बंद... तरीही WhatsAppवर मेसेज पाठवता येणार; हे भन्नाट फीचर आहे तरी काय? वापरायचं कसं?

WhatsApp Scheduled Messages Feature: WhatsApp Android आणि iPhone युजर्ससाठी Scheduled Messages हे नवीन फीचर आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

WhatsApp Scheduled Messages Feature: WhatsApp वापरणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने Android आणि iPhone युजर्ससाठी 'Scheduled Messages' हे नवीन फीचर आणले आहे. या फीचरमुळे आता तुम्हाला एखाद्याला मेसेज पाठवण्यासाठी ऑनलाइन राहण्याची गरज नाही. तुम्ही आधीच मेसेज लिहून त्याची तारीख आणि वेळ निश्चित करू शकता. त्यानंतर ठरलेल्या वेळी तो मेसेज आपोआप समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल.

समजा, तुमच्या एखाद्या मित्राचा वाढदिवस आहे किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. मात्र, रात्री १२ वाजता जागे राहणे शक्य नाही. अशा वेळी तुम्ही शुभेच्छांचा मेसेज आधीच लिहून ठेवू शकता. त्याची वेळ निश्चित केल्यानंतर WhatsApp तो मेसेज आपोआप पाठवेल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फीचरची मागणी अनेक दिवसांपासून युजर्सकडून केली जात होती. आता हे फीचर Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

WhatsApp वर मेसेज शेड्यूल कसा करायचा?

WhatsApp चे हे नवीन फीचर वापरणे अगदी सोपे आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वात अगोदर तुमच्या WhatsApp मध्ये ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे, ती चॅट उघडा.

  2. त्यानंतर पाठवायचा असलेला मेसेज टाइप करा किंवा फोटो आणि व्हिडिओ निवडा.

  3. आता सेंड बटण दाबून काही वेळ धरून ठेवा.

  4. त्यानंतर स्क्रीनवर तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल.

  5. तुम्हाला ज्या दिवशी आणि ज्या वेळी मेसेज पाठवायचा आहे, ती वेळ निवडा.

  6. शेवटी कन्फर्म केल्यानंतर तुमचा मेसेज शेड्यूल होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स सध्याच्या वेळेपासून किमान १० मिनिटांनंतर आणि जास्तीत जास्त १४ दिवसांपर्यंत मेसेज शेड्यूल करू शकतात.

फोन बंद असला तरी मेसेज पोहोचणार?

या फीचरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी इंटरनेट असण्याची किंवा WhatsApp सुरू ठेवण्याची गरज नाही. एकदा मेसेज शेड्यूल केल्यानंतर तो WhatsApp च्या सर्व्हरवर पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही ठरवलेल्या वेळी तो समोरच्या व्यक्तीला मिळेल.

विशेष म्हणजे, कंपनीच्या माहितीनुसार हे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतील. त्यामुळे मेसेजच्या गोपनीयतेचीही काळजी घेण्यात आली आहे.

तुम्ही शेड्यूल केलेले मेसेज चॅटच्या इन्फो स्क्रीनमध्ये पाहू शकता. एखादा मेसेज पाठवण्यापूर्वी त्यात बदल करायचा असेल किंवा तो डिलीट करायचा असेल, तर तो डिलीट करण्याची सुविधाही मिळेल. विशेष म्हणजे, शेड्यूल केलेला मेसेज डिलीट केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याबाबत कोणतीही माहिती मिळणार नाही.

WhatsApp च्या नवीन फीचरचे काय आहेत फायदे?

१. वाढदिवस आणि खास दिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी

मित्राचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा एखादा खास दिवस असेल, तर तुम्ही आधीच शुभेच्छांचा मेसेज तयार करू शकता. रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहण्याची गरज नाही. ठरलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल.

२. ऑफिसच्या कामांसाठीही उपयोगी

ऑफिसमधील सहकाऱ्यांना सकाळी एखादा महत्त्वाचा मेसेज पाठवायचा असेल किंवा ग्रुपमध्ये ठरावीक वेळी माहिती द्यायची असेल, तर हे फीचर उपयोगी ठरेल. तुम्ही कामाच्या वेळेआधीच मेसेज तयार करून ठेवू शकता.

३. फोटो, व्हिडिओ आणि लिंकही पाठवता येणार

या फीचरमध्ये केवळ साधे टेक्स्ट मेसेजच नाही, तर फोटो, व्हिडिओ आणि लिंकही शेड्यूल करता येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची माहिती किंवा एखादा फोटो ठरलेल्या वेळी पाठवणे सोपे होईल.

४. इंटरनेट किंवा फोन सुरू ठेवण्याची गरज नाही

एकदा मेसेज शेड्यूल केल्यानंतर फोन बंद असला किंवा WhatsApp सुरू नसले तरी मेसेज ठरलेल्या वेळी पाठवला जाईल. त्यामुळे मेसेज पाठवण्यासाठी फोन हातात घेऊन बसण्याची गरज नाही.

युजर्ससाठी फीचर कधी उपलब्ध होणार?

WhatsApp हे नवीन फीचर Android आणि iOS युजर्ससाठी जगभरात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व युजर्सना हे फीचर एकाच वेळी मिळेल असे नाही. तुमच्या WhatsApp मध्ये हे फीचर उपलब्ध झाले आहे की नाही, हे अॅप अपडेट करून तपासता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT