नवी दिल्ली : व्हॉट्सॲप हे संवाद साधण्याचे एक लोकप्रिय माध्यम असले तरी, त्याच्या प्रायव्हसीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या वैयक्तिक चॅट्सचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूलला प्रशिक्षित करण्यासाठी केला जाऊ शकतो? मात्र, व्हॉट्सॲपमध्येच एक असे खास फीचर आहे, जे तुमच्या चॅट्सना अधिक सुरक्षित ठेवते आणि AI पासून वाचवते.
आपण व्हॉट्सॲपच्या 'ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी' (Advanced Chat Privacy) या फीचरबद्दल बोलत आहोत. हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गप्पा AI साठी वापरण्यापासून रोखू शकता. इतकेच नाही, तर हे फीचर तुमचे चॅट एक्सपोर्ट (Export) होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.
'हे' व्हॉट्सॲपमधील एक प्रगत सुरक्षा फीचर आहे, जे प्रत्येक चॅटसाठी स्वतंत्रपणे लागू करता येते. तुम्हाला ज्या विशिष्ट व्यक्तीसोबतचे चॅट अधिक सुरक्षित करायचे आहे, त्यासाठी तुम्ही हे फीचर चालू करू शकता. आणि तुमचे खासगी संभाषण सुरक्षित देखील करू शकता
AI पासून सुरक्षा : तुमच्या चॅटचा वापर Meta AI सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात नाही.
चॅट एक्सपोर्टवर बंदी : हे फीचर सुरू असलेले चॅट कोणीही एक्सपोर्ट करू शकत नाही.
ऑटो-डाउनलोड बंद : त्या विशिष्ट चॅटमधील फोटो किंवा व्हिडिओ आपोआप तुमच्या फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत.
हे फीचर चालू करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे:
सर्वप्रथम तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सॲप उघडा.
तुम्हाला ज्या व्यक्तीसोबतचे चॅट सुरक्षित करायचे आहे, ते चॅट ओपन करा.
चॅटमध्ये वर दिसत असलेल्या कॉन्टॅक्टच्या नावावर क्लिक करा.
तुमच्या स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील. स्क्रोल करून खाली या.
येथे तुम्हाला 'Advanced Chat Privacy' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढील स्क्रीनवर तुम्हाला या फीचरची माहिती दिसेल. त्याखाली असलेल्या टॉगलवर (toggle) क्लिक करून हे फीचर ऑन करा.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे खासगी संभाषण अधिक सुरक्षित करू शकता. भविष्यात गरज वाटल्यास, याच पद्धतीने तुम्ही हे फीचर बंदही करू शकता. याशिवाय, व्हॉट्सॲपमध्ये ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ (Two-Step Authentication) सारखे इतरही अनेक सुरक्षा फीचर्स आहेत. हे फीचर तुमच्या अकाऊंटसाठी एक पिन कोड सेट करते, ज्यामुळे कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटवर लॉग-इन करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता अधिक मजबूत होते.