WhatsApp AI message summaries  Pudhari Photo
तंत्रज्ञान

WhatsAppचं नवं AI फीचर : आता व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक मेसेजचा सारांश एका क्लिकमध्ये वाचता येणार

WhatsApp AI message summaries | आता संवाद होणार अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित

मोनिका क्षीरसागर

Whatsapp AI New Feature update

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) आपल्या कोट्यवधी युजर्संसाठी एक भन्नाट फीचर सादर केलं आहे. या नव्या फीचरमुळे आता युजर्संना अनेक मेसेज एका छोट्या सारांशाच्या माध्यमातून पटकन समजून वाचता येणार आहेत. AI वर आधारित ‘Message Summaries’ हे फीचर WhatsApp च्या संवाद अनुभवाला आणखी वेगवान आणि सुलभ बनवत आहे.

काय आहे Message Summaries फीचर?

WhatsAppचं Message Summaries हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारं फीचर आहे. याच्या मदतीने, युजर्संना त्यांच्या चॅटमधील न वाचलेले अनेक मेसेज एकाच वेळी एका छोट्या सारांशात वाचता येतात. म्हणजेच, प्रत्येक मेसेज वेगळा वाचण्याची गरज नाही. AI तुमच्यासाठी मुख्य मुद्दे आणि माहिती एका क्लिकमध्ये समोर दाखवणार आहे. हे विशेषतः त्या वेळी उपयुक्त ठरतं, जेव्हा तुम्ही मीटिंग, प्रवास किंवा कामामुळे अनेक मेसेज मिस करता आणि नंतर एकदम खूप मेसेज येतात. तेव्हा कोणता मेसेज वाचायचा आणि कोणता टाळायचा असा प्रश्न युजर्संना पडतो, त्यांची ही अडचण या नवीन व्हॉट्सअ‍ॅप फिचरमुळे दूर होऊ शकते.

युजर्सच्या गोपनीयतेला प्राधान्य

मेटा (Meta) कंपनीने या फीचरमध्ये प्रायव्हेट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. त्यामुळे, तुमचे मेसेज किंवा त्याचे सारांश Meta किंवा WhatsApp कडून वाचले जात नाहीत. सर्व प्रक्रिया सुरक्षितपणे होते आणि तयार झालेला सारांश फक्त तुम्हालाच दिसतो. चॅटमधील इतर कोणालाही हे कळत नाही की, तुम्ही मेसेजचा सारांश घेतला आहे. त्यामुळे गोपनीयतेच्या दृष्टीने हे फीचर पूर्णपणे सुरक्षित आहे.

Message Summaries फीचर कसं वापरायचं?

हे फीचर डिफॉल्टने अ‍ॅक्टिव्हेट केलेलं नाही. युजर्सला आपल्या गरजेनुसार व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फिचर ऑन किंवा ऑफ करता येईल. Advanced Chat Privacy सेटिंग्सद्वारे कोणत्या चॅटसाठी AI सारांश मिळवायचा हेही ठरवता येतं. त्यामुळे, संवेदनशील किंवा खासगी चॅट्स AI सारांशातून वगळता येतात.

सध्या कुठे उपलब्ध?

सध्या अमेरिकेतील इंग्रजी भाषेतील युजर्संसाठी Message Summaries हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. Meta ने सांगितलं आहे की, लवकरच हे फीचर इतर देश आणि भाषांमध्येही देखील उपलब्ध होणार आहे.

आता संवाद होणार अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित

WhatsApp चं Message Summaries हे फीचर संवाद अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित बनवत आहे. आता अनेक मेसेज वाचण्यात वेळ न घालवता, एका छोट्या सारांशात संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे. त्यामुळे, WhatsApp युजर्संचा अनुभव आणखी समृद्ध होणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT