पुढारी ऑनलाईन डेस्क: vivo t4 | स्मार्टफोन निर्माता Vivo कंपनीने आपला नवा 5G स्मार्टफोन Vivo T4 5G भारतात आज (दि.२२) अधिकृतपणे लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे पॉवर, परफॉर्मन्स आणि परफेक्शनचा संगम आहे. उत्तम परफॉर्मन्स, आकर्षक डिझाईन आणि किफायतशीर किंमत यामुळे हा स्मार्टफोन युजर्समध्ये अधिक लोकप्रिय ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, VivoT4 5G या स्मार्टफोनमध्ये भारतातील इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा सर्वात मोठी 7300mAh हाय-डेनसिटी बॅटरी आणि 90W फ्लॅशचार्ज देण्यात आला आहे. जेणेकरून स्मार्टफोन फक्त 33 मिनिटांत 50% आणि 65 मिनिटांत 100% चार्ज होईल. हे स्मार्टफोन्स मंगळवार २९ एप्रिल 2025 पासून Flipkart, vivo India e-store आणि अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील, असेही कंपनीने म्हटले आहे.
हा स्मार्टफोन बायपास चार्जिंगला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे गेमिंगसारख्या गहन कामांमध्ये फोनच्या मदरबोर्डवर थेट वीज जाते, ज्यामुळे उष्णता जमा होण्याचे प्रमाण कमी होते आणि बॅटरीची कार्यक्षमता टिकून राहते. Vivo T4 तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त वेळ काम करत राहण्यासाठी खास बनवले आहे. तुम्ही जर सलग कॉलमध्ये असाल, गेम खेळण्यात गुंग असाल किंवा मोठ्या प्रमाणात कंटेंट कॅप्चर करत असाल, तर यासाठी कंपनीने खास VivoT4 5G स्मार्टफोन डिझाईन केला आहे.
Vivo T4 5G स्मार्टफोनमध्ये ५२ तासांपर्यंतचा टॉकटाइम, ८७ तासांचा म्युझिक प्लेबॅक, ३५ तासांचा व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि १५ तासांचा नॉन-स्टॉप गेमिंगसह विनाअडथळा वापरता येणार आहे. हा स्मार्टफोन तुमच्या लोड आणि व्यस्त कामासाठी तोंड देण्यासाठी खास डिझाइन केलेले आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन व्यस्त शेड्यूलमध्ये वापरताना आता तुम्हाला बॅटरीची काळजी करण्याची चिंता मिटली आहे.
vivo T4 5G हा स्मार्टफोन दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. Phantom Grey आणि Emerald Blaze. याच्या किंमती पुढीलप्रमाणे आहेत;
8GB RAM + 128GB स्टोरेज – 21,999 रुपये (सर्व करांसह)
8GB RAM + 256GB स्टोरेज – 23,999 रुपये (सर्व करांसह)
12GB RAM + 256GB स्टोरेज – 25,999 रुपये (सर्व करांसह)
भारतामधील सर्वात स्लीम स्मार्टफोन ज्यामध्ये 7300mAh हाय-डेनसिटीची बॅटरी.
5000 निट्स पीक ब्राइटनेससह सर्वाधिक तेजस्वी Quad-Curved AMOLED डिस्प्ले
सेगमेंटमधील सर्वात वेगवान डिव्हाइस – Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह, 820K+ AnTuTu स्कोअर
अधिक स्पष्ट, सजीव आणि डायनॅमिक फोटोसाठी 50MP OIS मुख्य कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा
4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, AI गेमिंग फीचर्स, IR ब्लास्टर, IP65 डस्ट-वॉटर रेसिस्टन्स व मिलिटरी ग्रेड मजबुती आहे.
स्मार्ट AI टूल्स – AI Erase, Photo Enhance, Note Assist, Live Text आणि Super Documents
HDFC, SBI, Axis बँक कार्डवर 2,000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट
2,000 रुपये एक्सचेंज बोनस व 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय