आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. मात्र, इंटरनेटचा वापर वाढत असतानाच मोबाईल नेटवर्कवरही तितकाच ताण येत आहे. परिणामी, अनेकदा कॉल ड्रॉप, स्लो इंटरनेट स्पीड आणि सिग्नल नसण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचे (TRAI) दोन महत्त्वाचे अॅप्स तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात.
हेही वाचा:
जर तुम्हाला इंटरनेट स्पीड सतत कमी वाटत असेल, तर TRAI MySpeed हे अॅप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या इंटरनेट स्पीडची तपासणी करू शकता आणि तक्रार देखील नोंदवू शकता. अॅपमध्ये "Begin Test" वर क्लिक केल्यावर तुमचा स्पीड दाखवला जातो आणि आवश्यक असल्यास तक्रार दाखल करता येते. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या अहवालानुसार, या अॅपने 10 लाखांहून अधिक यूजर्सना मदत केली आहे.
हेही वाचा:
जर तुम्हाला वारंवार कॉल ड्रॉप्स, कमकुवत सिग्नल किंवा नेटवर्क कव्हरेजची अडचण असेल, तर TRAI MyCall अॅप उपयुक्त आहे. या अॅपमध्ये तुम्ही नेटवर्क ऑपरेटर, लोकेशन आणि समस्या यांची माहिती देऊन तक्रार नोंदवू शकता.
हेही वाचा:
हे दोन्ही अॅप्स Google Play Storeवर मोफत उपलब्ध आहेत. यावर तक्रार नोंदवल्यानंतर काही दिवस वाट बघावी लागते, मात्र TRAI आणि टेलिकॉम कंपन्या या अॅप्सवर मिळालेल्या तक्रारी गांभीर्याने घेतात.