Google I/O Event Updates
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ची वार्षिक डेव्हलपर परिषद Google I/O अगदी जवळ आली आहे. ही परिषद २० मे रोजी सुरू होणार असून २१ मे पर्यंत चालणार आहे. या परिषदेत अँड्रॉइड 16 आणि गुगलच्या एआय मॉडेल जेमिनीशी (Gemini) संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. याशिवाय गुगल क्रोम , गुगल सर्च आणि युट्यूबबाबतही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
या परिषदेत गुगलचे कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचई, सहसंस्थापक डेमिस हासाबिस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून Google संबंधित नवीन बदलांबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) विशेष भर दिला जाणार असल्याचे समजते.
गुगलची सर्वात मोठी डेव्हलपर कॉन्फरन्स गुगल आय/ओ २०२५ जवळ येत आहे. तंत्रज्ञानात रस असलेले प्रत्येकजण याची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण या परिषदेत गुगल नेमक्या काय नवीन तंत्रज्ञानाची घोषणा करणार याकडे संपूर्ण जगातील तंत्रज्ञान प्रेमींचे लक्ष लागले आहे. अलीकडेच गुगलने 'द अँड्रॉइड शो' नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला. त्यात काही घोषणा देखील करण्यात आल्या होत्या. जसे की युजर्स त्यांचा हरवलेला अँड्रॉइड फोन कसा शोधू शकतात. गुगल आयओ मधील प्रत्येक गुगल उत्पादनाबद्दल काही माहिती उघड करणे अपेक्षित आहे.
गुगल आय/ओ २०२५ मध्ये कंपनी तिच्या उत्पादनांशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करू शकते. यामध्ये अँड्रॉइड १६ मधील नवीन वैशिष्ट्ये, जेमिनी एआयमधील (Gemini AI) सुधारणांचा समावेश आहे. कंपनी आपला XR हेडसेट देखील सादर करू शकते. जर ते गुगलने XR हेडसेट आणले तर ते थेट Apple शी स्पर्धा करेल. कंपनी सॅमसंगच्या सहकार्याने ते बनवत असल्याचे म्हटले जात आहे.
Google ची परिषद गुगल आय/ओ २०२५ ही मंगळवार २० आणि बुधवार २१ मे रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, ते २० मे रोजी रात्री १०:३० वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील शोरलाइन अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे.
गुगलचा आय/ओ २०२५ हा लाईव्ह इव्हेंट ऑनलाइन मोफत पाहता येणार आहे. हे एक माहितीपूर्ण सत्र असणार आहे, जे केवळ विकासकांसाठीच नाही तर सामान्य तंत्रज्ञान प्रेमींसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम Google कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर किंवा Google IO वर पाहू शकाल.