टेक उद्योगपती एलन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' विकले. File Photo
तंत्रज्ञान

एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' विकले, नवीन मालक कोण?

Elon Musk X | मस्क यांनी 'या' कंपनीसोबत केला ३३ अब्ज डॉलरचा व्यवहार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Elon Musk X | टेक अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) ३३ अब्ज डॉलरला विकला आहे. त्यांनी त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी एक्सएआयशी (XAI) हा व्यवहार केला आहे. या संदर्भातील घोषणा मस्क यांनी शुक्रवारी (दि.२८) केली.

मस्क यांना 'X' विक्रित ११ अब्ज डॉलरचा तोटा

मस्क यांनी २०२२ मध्ये ट्विटर नावाची साइट ४४ अब्ज डॉलर्सना विकत घेतली. नंतर त्यांनी त्याचे नाव बदलून X केले. आता X हे X AI ला 33 अब्ज डॉलरमध्ये विकले आहे. त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये याची घोषणा केली. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्याच्या किमतीत आणि आता एक्स विकलेल्या किमतीत ११ अब्ज डॉलरची तफावत आहे. म्हणजे मस्क यांनी तब्बल ११ अब्ज डॉलर तोट्यात X (एक्स) प्लॅटफॉर्म XAI ला (एक्सएआय) विकला आहे.

हे पाऊल 'XAI' च्या उन्नतीसाठी ; एलन मस्क

एलन मस्क यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, हे पाऊल XAI च्या प्रगतीसाठी आहे. X हे XAI ची क्षमता आणि विशेषता व्यापक उंचीसोबत त्याच्या अफाट क्षमता खुली करेल. या करारामुळे XAI चे मुल्य आता ८० अब्ज अमेरिकन डॉलर झाले आहे तर, X चे मुल्या हे ३३ अब्ज अमेरिकन डॉलर आहे.

XAI वेगाने कार्यक्षम होत आहे; मस्क

दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेले XAI वेगाने जगातील आघाडीच्या AI प्रयोगशाळांपैकी एक बनली आहे. जी अभूतपूर्व वेगाने आणि प्रमाणात मॉडेल्स आणि डेटाचे केंद्र तयार करत आहे. X हा एक डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे ६०० दशलक्षाहून अधिक सक्रिय युजर्स सत्याचा खरा स्रोत शोधण्यासाठी जातात आणि गेल्या दोन वर्षांत ते जगातील सर्वात कार्यक्षम कंपन्यांपैकी एक बनले आहे, भविष्यात स्केलेबल वाढ देण्यासाठी ते स्थानबद्ध झाले असल्याचेदेखील एलन मस्क म्हणाले.

XAI च्या प्रगतील X जोडले जाऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल 

एलन मस्क पुढे म्हणाले की X, AI आणि X चे भविष्य एकमेकांशी जोडलेले आहे. आम्ही अधिकृतपणे डेटा, मॉडेल्स, गणना, वितरण आणि प्रतिभा एकत्रित करण्याचे पाऊल उचलत आहोत. हे संयोजन XAI च्या प्रगत AI क्षमता आणि कौशल्याला एकत्रित करेल. एकत्रित कंपनी अब्जावधी लोकांना अधिक स्मार्ट, अधिक अर्थपूर्ण अनुभव देईल, शोध आणि ज्ञान वाढविण्याच्या आमच्या मुख्य ध्येयाची पूर्तता करेल. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्या सततच्या सहभागाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असेही मस्क यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT