स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) हे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यासाठी प्रसिद्ध असले तरी, आता ते एक महत्त्वाचे 'डिजिटल चोकपॉईंट' म्हणून समोर आले आहे. आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या बहुतांश उपसागरी इंटरनेट केबल्स (Submarine Cables) याच अरुंद सागरी मार्गातून जातात. सध्याच्या बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत आणि वाढत्या तणावामुळे, या केबल्सना हानी पोहोचल्यास संपूर्ण जगाचा इंटरनेट विस्कळीत होण्याची शक्यता आहे का?
संकटाचे केंद्र
बहुचर्चित स्ट्रेट ऑफ होर्मुझ केवळ कच्चे तेलच नाही, तर हा मार्ग जगाच्या डिजिटल कनेक्टिव्हिटीचा कणा आहे.
ऊर्जा: जगातील २०% कच्चे तेल आणि २५% याच मार्गातून जाते.
डेटा : जगातील ९७% डेटा उपग्रहाद्वारे नाही, तर समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे जातो. याद्वारे जग जोडले गेले आहे.
भारतासाठी हा मोठा धोका का आहे?
भारताची डिजिटल अर्थव्यवस्था या सागरी मार्गावर पूर्णपणे अवलंबून.
मुख्य केबल्स : SEA-ME-
WE, AAE-1 EIG सारख्या मोठ्या केबल सिस्टिम्स याच भागातून जातात.
इंटरनेट बैंडविड्थ : भारताला युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियाशी जोडणारा हा मुख्य दुवा आहे.
युद्धामुळे काय परिणाम होतील?
इंटरनेटचा वेग : केबल्सना नुकसान झाल्यास इंटरनेट प्रचंड मंद होईल.
लेटेंसी : डेटा ट्रॅफिक पॅसिफिक मार्गावरून वळवावे लागेल, ज्यामुळे विलंब वाढेल.
डिजिटल सेवा : Youtube, Net-
flix, Instagram वर बफरिंग वाढेल; व्हिडीओ कॉल्समध्ये अडथळे येतील.
आर्थिक व्यवहार : बँकिंग (Swift)
आणि आखाती देशांतून येणारे पैसे (Remittance) पाठवण्यास उशीर होईल. रु. २३.४८ लाख कोटींच्या IT क्षेत्रावर टांगती तलवार भारताचे आणि आऊटसोर्सिंग क्षेत्र २५० अब्ज डॉलर्स (रु. २३.४८ लाख कोटी) चे आहे.
SLA धोक्यात: अमेरिकन आणि युरोपीय क्लायंटस्शी रिअल-टाईम कनेक्टिव्हिटी तुटल्यास मोठा दंड सोसावा लागेल.
शेअर बाजार -
हाय - फ्रिक्वेन्सी ट्रेंडिंगमध्ये मिलिसेकंदांचा उशीर कोट्यवधींचे नुकसान ठरू शकते.
इंटरनेट पूर्णपणे बंद होईल का?
नाही: इंटरनेटची रचना री-रूटिंग (पर्यायी मार्ग) तत्त्वावर आधारित आहे.
पर्यायी मार्ग: एक मार्ग बंद झाल्यास डेटा दुसऱ्या मागनि वळवला जातो.
तोटा : पर्यायी मार्गावर लोड वाढल्याने इंटरनेटचा वेग अत्यंत कमी होईल.
उपाय आणि सुरक्षा
भारत आणि जग आता या डिजिटल चोकपॉईंटवर अवलंबून राहणे टाळत आहे.
सॅटेलाईट इंटरनेट : एलन मस्क यांच्या स्टारलिंकसारख्या सेवांकडे बॅकअप म्हणून पाहिले जात आहे.