social media security tips 
तंत्रज्ञान

सोशल मीडियाचा अतिवापर करताय? सावधान! हॅकर्स लावु शकतात 'चूना' ; सुरक्षित राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

social media security tips: हॅकर्स तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून छोटी-छोटी माहिती मिळवतात आणि त्याचा वापर तुम्हाला फसवण्यासाठी करतात

मोनिका क्षीरसागर

आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर प्रत्येकजण करत आहे, पण काही लोक याचा अतिवापर करू लागले आहेत. ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कॅप्चर करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, अनेक हॅकर्स याच माहितीचा गैरवापर करून तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान (चूना) पोहोचवू शकतात.

हॅकर्स तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून छोटी-छोटी माहिती मिळवतात आणि त्याचा वापर तुम्हाला फसवण्यासाठी करतात. ते तुमच्या नावाने बनावट आयडी तयार करून लोकांकडून पैसे उकळतात, फर्जी लिंक पाठवतात किंवा प्रेमाचे नाटक करून फसवणूक करतात.

या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी खालील उपाययोजना करा

सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाचे उपाय:

1. प्रायव्हसी सेटिंग्ज बदला:

तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये जा.

पब्लिक प्रोफाइलला प्रायव्हेट करा.

तुमच्या पोस्ट, लाईव्ह, फोटो किंवा व्हिडिओ इतरांना दिसावेत की नाही हे निवडा.

फेसबुकमध्ये 'प्रायव्हसी चेकअप' आणि 'ऑफ-फेसबुक ॲक्टिव्हिटी टूल' वापरा.

ॲप्स आणि गेम्ससोबत डेटा शेअर करणे थांबवा.

2. पासवर्ड मॅनेजरचा वापर करा:

एकच पासवर्ड अनेक ठिकाणी वापरू नका.

प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड तयार करा.

या सर्व पासवर्डचे व्यवस्थापन करण्यासाठी पासवर्ड मॅनेजरचा उपयोग करा.

3. मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) चालू करा:

हॅकर्सपासून वाचण्यासाठी अकाउंटला MFA ने सुरक्षित ठेवा.

सेटिंगमधील 'सिक्युरिटी' विभागात जा.

ॲप किंवा हार्डवेअर की वापरून हे चालू करा.

प्रत्येक लॉगिनवर कोड किंवा डिव्हाइसची आवश्यकता असेल, पण यामुळे तुमचा डेटा अतिसुरक्षित राहील.

4. जुनी अकाउंट्स डिलीट करा:

जुनी आणि वापरात नसलेली अकाउंट्स ठेवणे धोक्याचे आहे.

ठग हॅक करून ही अकाउंट्स 'झोम्बी अकाउंट' बनवतात.

फोटो आणि व्हिडिओ वापरून बनावट वस्तू विकतात किंवा मित्रांना फिशिंग लिंक पाठवतात.

डिलीट करण्यापूर्वी महत्त्वाचा कंटेंट डाउनलोड करा.

5. सोशल मीडियापासून अंतर कसे ठेवावे?

जर तुम्हाला जास्त गोष्टी शेअर करण्याची सवय असेल, तर सुरक्षित मेसेजिंग ॲप्स (उदा. Signal) वापरा. सिग्नलमध्ये स्टोरीज आणि फीड आहेत, ज्यामुळे तुम्ही मित्रांशी सहज जोडले राहू शकता. तुम्ही जर जास्त भावनिक (Expressive) असाल आणि भावना इतरांना दाखवायच्या असतील, तर डायरी लिहा. यासाठी तुम्ही डिजिटल ॲप्सचा वापर करू शकता. iOS नोट्स ॲपमध्ये आपले विचार सुरक्षितपणे ठेवा. थोडे 'लाईक्स' किंवा क्षणिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपली खासगी माहिती (प्रायव्हसी) गमावण्यापासून सावध रहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT