Samsung Launches Attractive Music Frame in India
सॅमसंग म्‍युझिक फ्रेम Samsung Official
तंत्रज्ञान

सॅमसंगकडून भारतात आकर्षक म्‍युझिक फ्रेम लाँच

करण शिंदे

नवी दिल्ली : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने बुधवारी (दि.26) भारतात म्‍युझिक फ्रेम लाँच केला. कलाकृतीसारखा दिसणारा वायरलेस स्‍पीकर सॅमसंग म्‍युझिक फ्रेममध्‍ये डॉल्‍बी अॅटमॉस आणि वायरलेस म्‍युझिक स्ट्रिमिंग अशी नवीन वैशिष्‍ट्ये आहेत आणि किंमत केवळ 23,990 रूपये आहे. सॅमसंग म्‍युझिक फ्रेम आजपासून सॅमसंग आणि अमेझॉन या वेबसाईटवर आणि निवडक ऑफलाइन स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

''आधुनिक काळातील ग्राहक कार्यक्षमता व आकर्षकतेचे संयोजन असण्‍यासोबत व्हिज्‍युअली लक्षवेधक दिसणाऱ्या उत्‍पादनांचा अधिकाधिक शोध घेत आहेत. या ट्रेण्‍डला त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व व स्‍टाइलला दाखवणाऱ्या आणि लिव्हिंग स्‍पेसच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करणाऱ्या उत्‍पादनांसाठी असलेल्‍या इच्‍छेचे पाठबळ आहे. नवीन म्‍युझिक फ्रेममध्‍ये अद्वितीय, आकर्षक डिझाइनसह पिक्‍चर फ्रेमच्‍या स्‍वरूपात अपवादात्‍मक तंत्रज्ञान आहे, तसेच सिनेमॅटिक ऑडिओ अनुभव देते,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

म्‍युझिक फ्रेम वापरकर्त्‍यांना वायरशिवाय संगीत ऐकण्‍याचा आनंद देतो, तसेच उच्‍च दर्जाची साऊंड क्‍वॉलिटी देतो, जे सुस्‍पष्‍ट ऑडिओसह कोणत्‍याही स्‍पेसमध्‍ये उत्‍साहाची भर करते. यामधील वैयक्तिकृत, फ्रेम केलेली कलाकृती होम डेकोरला अधिक आकर्षक करते, ज्‍यामधून लिव्हिंग स्‍पेसेसची आकर्षकता वाढवण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्‍याप्रती सॅमसंगची क्षमता दिसून येते. यामुळे हा कोणत्‍याही घरामध्‍ये समाविष्‍ट करता येईल असा शक्तिशाली स्‍पीकर आहे, जो आकर्षकरित्‍या डिझाइन केलेल्‍या डिवाईसमध्‍ये आकर्षक व्हिज्‍युअल लुक व अपवादात्‍मक ऑडिओ कार्यक्षमता देतो.

सॅमसंग म्युझिक फ्रेमचे फिचर्स

म्युझिक फ्रेम अशा लोकांसाठी बनवण्यात आले आहे, ज्यांना स्टाइलिश गोष्टींसोबतच उत्तम कार्यक्षमता असलेल्या वस्तूंचीही आवड आहे. हा स्पीकर खास Dolby Atmos तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यामुळे तुम्ही चित्रपट पाहत असाल, गाणे ऐकत असाल किंवा गेम खेळत असाल, तुम्हाला आवाज चारही बाजूंनी येतोय असे वाटेल. या खास तंत्रज्ञानामुळे खोलीत कुठेही बसा, आवाज सर्वत्र एकसारखाच चांगला ऐकू येईल.

तसेच, यामध्ये अॅलेक्सा आणि गुगल असिस्टंट यासारखे वॉइस असिस्टंट्स इनबिल्ट आहेत. म्हणजे आता तुम्हाला बटण दाबण्याऐवजी फक्त बोलूनच तुमचे आवडते गाणे लावता येतील, गाणे बदलता येतील आणि आवाज कमी-जास्त करता येईल.

SCROLL FOR NEXT