Royal Enfield Cheapest Bike Hunter 350 Launched
मुंबई : देशातील प्रमुख परफॉर्मन्स बाइक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आपली सर्वात किफायतशीर बाइक हंटर 350 पूर्णपणे नव्या अंदाजात विक्रीसाठी लाँच केली. कंपनीने या बाइकमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलच्या तुलनेत अधिक उत्तम बनली आहे. नव्या स्टाइल आणि पेंट-स्कीमसह सादर करण्यात आलेल्या या बाइकच्या बेस प्राइसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याची सुरुवातीची किंमत 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
दिल्लीत आयोजित हंटरहुड फेस्टिव्हलमध्ये हंटर 350 चे लाँचिंग झाले. बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या हंटर 350 ला कंपनीने तीन नव्या रंग पर्यायांमध्ये सादर केले आहे, ज्यात रियो व्हाइट, टोक्यो ब्लॅक आणि लंडन रेड यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, हंटर 350 मध्ये काही अशी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत जी या सेगमेंटमधील इतर अर्बन बाईक्ससाठी एक नवा टप्पा निश्चित करतात.
नव्या रंग पर्यायांव्यतिरिक्त, कंपनीने हंटर 350च्या एर्गोनॉमिक्समध्येही सुधारणा केली आहे. सर्वात मोठा बदल कंपनीने बाइकच्या मागील सस्पेंशन सेटअपमध्ये केला आहे. यात नवीन सस्पेंशन सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय, LED हेडलाइट, ट्रिपर पॉड आणि टाइप-C USB पोर्ट देण्यात आले आहे, जे फास्ट चार्जिंग सेटअपसह येते. कंपनीने या बाइकचे ग्राउंड क्लीयरन्स 10 मिमीने वाढवले आहे, ज्यामुळे खराब रस्त्यांवरही उत्तम रायडिंग अनुभव मिळण्यास मदत होते.
हंटर 350 साठी अधिकृत बुकिंग सुरू झाले आहे. ही बाईक कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपवरून बुक करता येईल. त्याची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल. त्याची किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 1,81,750 रुपयांपर्यंत जाते.