टेकन्यूज डेस्क: एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू (gadget) खरेदी करणे अनेकांच्या खिशाला परवरड नाही. त्यामुळे बहुतांशी लोक सेकंड-हँड किंवा सध्या प्रचलित असलेल्या रिफर्बिश्ड डिवाईस खरेदी करण्यास प्राधान्य देतात, परंतु या दोन्ही पैकी काय योग्य यामध्ये देखील ग्राहकांचा नेहमीच गोंधळ उघड असतो. त्यामुळे रिफर्बिश्ड किंवा सेकंड-हँड डिवाईस खरेदी करण्यापूर्वी कमी किमतीत स्मार्ट निर्णय कसा घ्यायचा याविषयी जाणून घेऊया...
रिफर्बिश्ड डिवाईस म्हणजे फक्त वापरलेली वस्तू नव्हे, तर ती पूर्णपणे तपासलेली, दुरुस्त केलेली आणि पुन्हा विक्रीसाठी तयार केलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. ग्राहकांच्या मनात नेहमीच शंका असते, की रिफर्बिश्ड प्रोडक्ट्स विश्वासार्ह आहेत का? पण तज्ञ सांगतात, योग्य प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यास हे डिवाईस पूर्णपणे टेस्टेड आणि वारंटी असलेले मिळतात, शिवाय नवीन डिवाईसच्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध होतात.
रिफर्बिश्ड डिवाईस म्हणजे फक्त स्वस्त पर्याय नाही, तर स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक निवड आहे. योग्य माहिती आणि काळजीपूर्वक निवड केल्यास, हे डिवाईस तुमच्या बजेटमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान देऊ शकतात.
रिफर्बिश्ड टॅग असलेल्या डिवाईसचा वापर पूर्वी कोणीतरी केला असतो किंवा त्यात काही तांत्रिक समस्या आढळलेल्या असतात. कंपनी किंवा सर्टिफाइड विक्रेता हे डिवाइस परत घेऊन, आवश्यक दुरुस्ती करतात आणि अनेक टेस्टिंगनंतर पुन्हा विकतात. स्क्रीन, बॅटरी, सॉफ्टवेअर यासारख्या भागांची दुरुस्ती होते आणि नंतर क्वालिटी चेक केला जातो. हे डिवाइस ग्रेडिंग सिस्टीममध्ये विकले जातात:
A-ग्रेड: जवळपास नवीन, हलके निशान.
B-ग्रेड: हलके स्क्रॅच, परफॉर्मन्सवर परिणाम नाही.
C-ग्रेड: जास्त वापरलेले, किंमत कमी.
सेकंड-हँड:
कोणतीही टेस्टिंग नाही.
वारंटी नाही
क्वालिटीची हमी नाही
फक्त विक्रेता व ग्राहक
रिफर्बिश्ड डिवाइस:
पूर्णपणे टेस्टेड व दुरुस्त
वारंटी असते (३-१२ महिने)
क्वालिटी चेक व ग्रेडिंग
कंपनी/सर्टिफाइड विक्रेता
कमी किंमत: नवीन डिवाईसच्या तुलनेत ३०-५०% पर्यंत स्वस्त.
वारंटी व रिटर्न पॉलिसी: अनेक उत्पादने ३-१२ महिन्यांची वारंटी आणि ३० दिवसांची रिटर्न पॉलिसी देतात.
विश्वासार्हता: सर्टिफाइड विक्रेत्यांकडून खरेदी केल्यास क्वालिटीची हमी मिळते.
पर्यावरणपूरक: नवीन डिवाईस बनवताना लागणारे खनिज, पाणी, वीज वाचते, ई-वेस्ट कमी होते.
फॅक्टरी सर्टिफाइड प्रोडक्ट निवडा, कारण हे उत्पादने अधिक चांगल्या टेस्टिंगनंतर आणि मॅन्युफॅक्चरर वारंटीने येतात.
वारंटी तपासा: शक्यतो एक वर्षाची वारंटी असलेले प्रोडक्ट निवडा.
एक्सेसरीज व पॅकेजिंग: चार्जर, केबल, सॉफ्टवेअर यासारख्या सर्व गोष्टी तपासा.
रिटर्न पॉलिसी: रिटर्न पॉलिसी वाचा, जेणेकरून काही समस्या आल्यास सहज परत करता येईल.
विश्वसनीय प्लॅटफॉर्म: रिव्ह्यू वाचून, सर्टिफाइड विक्रेत्याकडूनच खरेदी करा.