तंत्रज्ञान

Realme New Phone : ‘रिअलमी’ने आणला 15000mAh बॅटरीयुक्त स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये 3 महिने राहणार कार्यरत

Realmeने Chill Fan नावाचा स्मार्टफोनही सादर केला

पुढारी वृत्तसेवा

Realme 15000mAh Ultra High Density Battery Phone

चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ‘Realme’ने दोन नवीन स्मार्टफोन (कॉन्सेप्ट) सादर केल्या आहेत. यामध्ये अद्वितीय आणि दमदार वैशिष्ट्ये आहेत. चीनमध्ये झालेल्या '828 फॅन फेस्टिव्हल'मध्ये ब्रँडने दोन्ही कॉन्सेप्ट फोनचे अनावरण केले. यापैकी एक फोन 15,000mAh क्षमतेच्या बॅटरीसह येतो, जी आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये उपलब्ध असलेली सर्वात मोठी बॅटरी आहे.

या वर्षीच्या सुरुवातीलाही ‘Realme’ने 10,000mAh क्षमतेच्या बॅटरीचा एक कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 15,000mAh बॅटरी असलेल्या फोनवर 50 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक करता येईल. याव्यतिरिक्त, कंपनीने Chill Fan नावाचा स्मार्टफोनही सादर केला. यात एक फॅन बसविण्यात आला असून, तो डिव्हाइसचे तापमान नियंत्रित ठेवतो.

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Realme च्या ‘828 फॅन फेस्टिव्हल’च्या थेट प्रक्षेपणात कंपनीने 15,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन दाखवला. कंपनी या स्मार्टफोनला पोर्टेबल पॉवर स्टेशन म्हणून संबोधित करत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या स्मार्टफोनचा वापर इतर फोन आणि या डिव्हाइसद्वारे वापरकर्ते इतर स्मार्टफोन्स तसेच वियरेबल डिव्हाइस (Wearable device) चार्ज करू शकतात.

Realme चे उपाध्यक्ष चेस झू यांच्या मते, वापरकर्ते एकाच चार्जमध्ये या फोनवर सलग 25 चित्रपट पाहू शकतात. त्याचप्रमाणे, या हँडसेटवर 18 तास व्हिडिओ रेकॉर्डिंग, 30 तास गेमिंग किंवा 5 दिवसांपर्यंत सामान्य वापर करता येईल. फ्लाइट मोडमध्ये हा फोन तब्बल 3 महिन्यांचा स्टँडबाय टाइम प्रदान करतो.

तांत्रिक वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीने अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. तथापि, रिपोर्टनुसार हा हँडसेट Android 15 या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर, 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

यासोबतच कंपनीने Realme Chill Phone देखील सादर केला. या फोनमध्ये बिल्ट-इन कूलिंग सिस्टम असून, ब्रँडने त्याला ‘बिल्ट-इन एसी’ असे संबोधले आहे. टीझर व्हिडिओमध्ये हँडसेटच्या फ्रेमवर एक व्हेंट ग्रिल दिसून आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फॅनमुळे स्मार्टफोनचे तापमान जवळपास 6 अंश सेल्सियसपर्यंत कमी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT