बीजिंग : दिग्गज टेक कंपनी 'ओप्पो'ने (Oppo) बुधवारी (दि. १) चीनमध्ये आपले दोन नवीन स्मार्टफोन Oppo K15 Pro+ आणि Oppo K15 Pro सह Oppo Watch X3 लाँच केली आहे. प्रामुख्याने गेमिंग शौकिनांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले हे स्मार्टफोन K15 मालिकेतील पहिलेच मॉडेल्स आहेत. या सीरिजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात वापरण्यात आलेले 'नेक्स्ट जनरेशन ॲक्टिव्ह कूलिंग फॅन', जे फोनला दीर्घकाळ गेमिंग दरम्यान गरम होण्यापासून वाचवतात.
Oppo K15 Pro सीरिजमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, यात ५०MP चा मुख्य कॅमेरा आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ओप्पो चीनच्या ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. Oppo K15 Pro+ मध्ये परफॉर्मन्सला अधिक वेग देण्यासाठी MediaTek Dimensity 9000 सीरिजचा चिपसेट वापरण्यात आला आहे.
Oppo K15 Pro+:
बेसिक व्हेरिएंट (12GB RAM + 256GB) : CNY ३,४९९ (अंदाजे ४७,००० रुपये)
स्टँडर्ड व्हेरिएंट : CNY ३,६९९ (अंदाजे ५०,००० रुपये)
टॉप-एंड व्हेरिएंट (12GB RAM + 512GB): CNY ४,१९९ (अंदाजे ५७,००० रुपये)
Oppo K15 Pro:
बेसिक व्हेरिएंट : CNY २,९९९ (अंदाजे ४१,००० रुपये)
स्टँडर्ड व्हेरिएंट : CNY ३,१९९ (अंदाजे ४३,००० रुपये)
टॉप-एंड व्हेरिएंट (12GB + 512GB): CNY ३,४९९ (अंदाजे ४७,००० रुपये)
चीनमध्ये ३ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३०) ओप्पो स्टोअरवर याची विक्री सुरू होईल. हे फोन सायबर विंग्स, ओरिजिन ग्रे, फोटोडस्ट, गोल्डन लेजेंड आणि रेडियंट डस्ट अशा आकर्षक रंगांत उपलब्ध आहेत.
हे दोन्ही ड्युअल सिम हँडसेट अँड्रॉइड १६ वर आधारित ColorOS 16 वर चालतात.
डिस्प्ले
K15 Pro+ : ६.७८ इंच Full-HD+ डिस्प्ले, १६५Hz रिफ्रेश रेट आणि १,८०० nits पीक ब्राइटनेस.
K15 Pro : ६.५९ इंच Full-HD+ डिस्प्ले, १४४Hz रिफ्रेश रेट आणि १,२०० nits पीक ब्राइटनेस.
K15 Pro+ मध्ये MediaTek Dimensity 9500s (३.७३GHz) तर K15 Pro मध्ये Dimensity 8500 Super (३.४GHz) चिपसेट आहे. दोन्ही फोनमध्ये १२GB LPDDR5x RAM असून ५१२GB पर्यंत अंतर्गत स्टोअरेजची सोय आहे.
दोन्ही फोनमध्ये ५०MP चा प्रायमरी कॅमेरा (f/1.8) असून यात 'टू-ॲक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन' (OIS) आणि १०x डिजिटल झूमची सुविधा आहे. सोबतच ८MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि सेल्फीसाठी १६MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे फोन ४K/६० fps वेगाने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहेत.
Oppo K15 Pro+ मध्ये ८,०००mAh ची अजस्त्र बॅटरी आणि १००W SuperVOOC फास्ट चार्जिंग मिळते. तर Oppo K15 Pro मध्ये ७,५००mAh बॅटरी आणि ८०W फास्ट चार्जिंगचा आधार आहे.
सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५G, वाय-फाय ७, ब्लूटूथ ५.४, USB Type-C आणि प्रगत नेव्हिगेशन सिस्टम (GPS, NavIC) उपलब्ध आहे.