प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड मोटोरोलाने मंगळवारी मोटो जी०६ पॉवर स्मार्टफोनच्या लॉन्चची घोषणा केली. हा स्मार्टफोन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन अनुभवाला एक नवीन आयाम देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यात मोठी बॅटरी, सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले आणि विविध वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ‘मोटो जी06 पॉवर’मध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी 7000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी एकदा फुल चार्ज केल्यावर सहजपणे 3 दिवसांपर्यंत टिकवून ठेवते, असा दावा कंपनीने केला आहे.
‘मोटो जी06 पॉवर’मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सिक्युरिटीसह 6.88 इंच आकाराचा आणि 120 Hz रिफ्रेश रेट असलेला या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही प्रकाशात उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी हा फोन 50 MP क्वाड पिक्सेल कॅमेऱ्याने सुसज्ज आहे.
मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन मोटो जी06 पॉवर भारतीय बाजारपेठेत 7,499 रुपये या आकर्षक किमतीत लाँच केला आहे. हा मोबाईल उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असून वापरकर्त्यांना एक उत्तम अनुभव प्रदान करेल, असेही कंपनीने म्हटले आहे.
6.88 इंच HD+ डिस्प्ले आणि 120 Hz रिफ्रेश रेट : मोटो जी06 पॉवरमध्ये सेगमेंटमधील सर्वात मोठा 6.88 इंच डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट सह येतो. यासोबतच, वॉटर टच टेक्नॉलॉजी आणि डॉल्बी ॲटमॉस स्टीरिओ स्पीकर्स वापरकर्त्यांना उत्कृष्ट मनोरंजनाचा अनुभव देतात.
50 MP क्वाड पिक्सेल कॅमेरा सिस्टीम : मोटो जी06 पॉवरमध्ये 50 MP क्वाड पिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे, जो कोणत्याही प्रकाशाच्या परिस्थितीत चमकदार छायाचित्रे क्लिक करतो. याव्यतिरिक्त, 8 MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी सर्वोत्तम आहे.
मीडियाटेक जी81 एक्स्ट्रीम प्रोसेसर आणि 12 GB रॅम : या मोबाईलमध्ये मीडियाटेक जी81 एक्स्ट्रीम (MediaTek G81 Extreme) प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच, रॅम बूस्ट (RAM Boost) तंत्रज्ञानामुळे 12 GB पर्यंत रॅम उपलब्ध होते, जी उत्कृष्ट मल्टीटास्किंग आणि गेमिंग अनुभव प्रदान करते.
अत्यंत उत्कृष्ट डिझाइन आणि टिकाऊपणा : मोटो जी06 पॉवर पँटोन-क्यूरेटेड व्हेगन लेदर फिनिशसह डिझाइन केलेला आहे. यात IP64 जलरोधक (Water Resistance) क्षमता आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देखील आहे, ज्यामुळे हे डिव्हाइस अधिक टिकाऊ बनते. हा स्मार्टफोन टॅपेस्ट्री (Tapestry), लॉरेल ओक (Laurel Oak), आणि टेंड्रिल (Tendril) या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
मोटो अनुभव : मोटो जी06 पॉवरमध्ये सर्कल टू सर्च विथ गूगल, मोटो सिक्युअर, थिंकशील्ड आणि हॅलो यूएक्स यांसारखी विशेष वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी वापरकर्त्यांना कार्यक्षमता, वैयक्तिकीकरण आणि सुरक्षिततेच्या बाबतीत उत्तम अनुभव देतात.
हे डिव्हाइस 4 GB + 64 GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे, जे 12 GB पर्यंत रॅम बूस्टसह वाढवता येते. मोटो जी06 पॉवरची विक्री 11 ऑक्टोबर 2025 पासून फ्लिपकार्ट, Motorola.in आणि भारतातील प्रमुख रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.