Messenger App 
तंत्रज्ञान

Messenger App news: अटेन्शन! 15 डिसेंबरपासून फेसबुकची 'ही' सेवा होणार बंद; Metaचा मोठा निर्णय

Facebook Messenger update 2025: इथून पुढे युजर्संना मेसेंजर वापरण्यासाठी वेब ब्राउझरचाच वापर करावा लागणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे मेसेंजर अ‍ॅप युजर्संना मोठा धक्का बसणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की १५ डिसेंबरपासून Windows आणि Mac या दोन्ही प्रणालींवर मेसेंजर डेस्कटॉप अ‍ॅप बंद केले जाणार आहे.

एका अहवालानुसार, ठरलेल्या तारखेनंतर लॅपटॉपवर मेसेंजर अ‍ॅप चालवता येणार नाही. अशा युजर्संना थेट फेसबुकच्या वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाणार आहे. म्हणजेच इथून पुढे युजर्संना मेसेंजर वापरण्यासाठी वेब ब्राउझरचाच वापर करावा लागणार आहे.

टेक क्रंचच्या रिपोर्टनुसार, मेटा कंपनीने सांगितले आहे की, सर्व डेस्कटॉप यूजर्संना नोटिफिकेशन पाठवून या बदलाची माहिती दिली जाणार आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, १५ डिसेंबरनंतर मेसेंजर डेस्कटॉप अ‍ॅपला सपोर्ट बंद होणार आहे. कंपनीने युजर्संना अ‍ॅप डिलीट करण्याचाही सल्ला दिला आहे, कारण त्याचा वापर पुढे करता येणार नाही.

स्मार्टफोनवरील मेसेंजर अ‍ॅप नेहमीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. बहुतेक लोक मेसेंजरचा वापर मोबाईलवरच करतात, तरीही डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर मेसेंजर अ‍ॅप वापरणाऱ्यांचीही मोठी संख्या आहे, त्यामुळे या निर्णयाचा परिणाम त्या युजर्सवर देखील होणार आहे.

आता पर्याय काय?

अहवालांनुसार, मेसेंजर अॅप युजर्संना Windows आणि Mac यूजर्संना काही नवे पर्याय उपलब्ध होतील. हे यूजर्स आपल्या डेस्कटॉपवर फेसबुक थेट वापरू शकतील किंवा मेसेंजरचे वेब व्हर्जन म्हणजेच वेबसाइटद्वारे चॅटिंग करू शकतील. मात्र, मेसेंजरचे डेस्कटॉप अॅप वापरता येणार नाही.

चॅट हिस्ट्री कशी save होईल

मेटाने Windows आणि Mac वर मेसेंजर वापरणाऱ्या यूजर्ससाठी खास मार्गदर्शन दिले आहे. हे यूजर्स आपली चॅट हिस्ट्री सेव करून ठेवू शकतात.

यासाठी, वेब व्हर्जनवर जाण्यापूर्वी Secure Storage (सुरक्षित संचय) फीचर सक्रिय करावे लागेल आणि एक PIN सेट करावा लागेल.

एकदा PIN सेट केल्यानंतर, जेव्हा यूजर वेब व्हर्जनवर लॉगिन करेल तेव्हा त्याची जुनी चॅट हिस्ट्री तिथे उपलब्ध राहील, म्हणजेच चॅट डेटा सुरक्षितपणे साठवला जाईल.

'हे' स्टेप्स नक्की वापरून पहा

चॅट हिस्ट्री सेव करण्यासाठी Secure Storage सक्रिय करणे आवश्यक आहे. ते सक्रिय आहे की नाही हे पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा...

  • Settings (सेटिंग्ज) आयकॉनवर क्लिक करा.

  • Privacy and Safety (गोपनीयता आणि सुरक्षा) या विभागात जा.

  • End-to-End Encryption (पूर्ण एन्क्रिप्शन) पर्याय निवडा.

  • त्यानंतर Message Storage (संदेश संचय) हा पर्याय दिसेल.

  • त्या पर्यायावर क्लिक करून ‘Turn On Secure Storage’ (सुरक्षित संचय सुरू करा) हे फीचर ऑन करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT