Meta Subscription Plans: सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. Meta ने Instagram, Facebook आणि WhatsApp साठी नवीन पेड सब्सक्रिप्शन प्लॅनची घोषणा केली आहे. म्हणजेच, आता काही खास आणि प्रीमियम फीचर्स वापरण्यासाठी यूजर्सना दर महिन्याला पैसे मोजावे लागू शकतात. कंपनीने हे प्लॅन जगभरातील यूजर्ससाठी जाहीर केले असून भारताचाही त्यात समावेश आहे.
Meta आता आपल्या लोकप्रिय अॅप्सचे ‘Plus’ व्हर्जन आणत आहे. या व्हर्जनमध्ये पैसे भरून सब्सक्रिप्शन घेणाऱ्या यूजर्सना काही एक्सक्लुझिव्ह फीचर्स, अधिक कस्टमायझेशन पर्याय आणि प्रीमियम अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे फीचर्स मोफत वापरणाऱ्या यूजर्सना उपलब्ध नसतील.
Meta ची कमाई आतापर्यंत प्रामुख्याने जाहिरातींवर अवलंबून होती. मात्र आता कंपनी केवळ जाहिरातींवर अवलंबून राहू इच्छित नाही. त्यामुळेच Meta ने सब्सक्रिप्शन मॉडेलवर भर देत महसूल वाढवण्याचा नवा मार्ग स्वीकारला आहे. कंपनीचा उद्देश स्पष्ट आहे. जे यूजर्स अधिक चांगला अनुभव, प्रीमियम टूल्स आणि चांगले फीचर्स वापरू इच्छितात, त्यांनी त्यासाठी दर महिन्याला पैसे द्यावेत.
कंपनीच्या माहितीनुसार, Instagram Plus आणि Facebook Plus साठी दर महिन्याला 3.99 डॉलर म्हणजेच अंदाजे 387 रुपये मोजावे लागतील. तर WhatsApp Plus साठी 2.99 डॉलर म्हणजेच सुमारे 290 रुपये खर्च करावे लागू शकतात. भारतासाठी अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
TechCrunch च्या रिपोर्टनुसार, WhatsApp Plus मध्ये यूजर्सना अनेक प्रीमियम फीचर्स मिळतील. विशेषतः मेसेजिंग अनुभव अधिक चांगला असणार आहे. यामध्ये कस्टम थीम्स, वेगळ्या रिंगटोन्स, प्रीमियम स्टिकर्स, अधिक चॅट्स पिन करण्याची सुविधा आणि इतर कस्टमायझेशन फीचर्स मिळू शकतात.
Instagram Plus आणि Facebook Plus वापरणाऱ्यांना काही खास अॅडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. उदाहरणार्थ, Instagram वर तुमची स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली गेली हे समजू शकणार आहे. तसेच ‘Close Friends’ फीचरच्या पुढे जाऊन यूजर्सना अनलिमिटेड स्टोरी ऑडियन्स लिस्ट तयार करण्याची सुविधा मिळेल.
Meta कडून आणखी काही आकर्षक फीचर्स देण्यात येणार आहेत. यात 24 तासांपेक्षा जास्त काळ स्टोरी दिसण्याचा पर्याय, आठवड्यातून एकदा स्टोरी स्पॉटलाइट करण्याची सुविधा, तसेच स्टोरी पाहणाऱ्यांच्या यादीत सर्च करण्याचा पर्याय असणार आहे.
याशिवाय Instagram Plus यूजर्सना Animated Super Heart Reaction, Custom App Icons, Bio साठी वेगळे Fonts आणि अधिक Profile Pins सारखे फीचर्स मिळतील.
Meta चे हे नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन Meta Verified पासून वेगळे आहेत. सध्या Meta Verified मध्ये ओळख पडताळणी (Identity Verification) आणि ग्राहक सेवा (Customer Support) यांसारख्या सुविधा दिल्या जातात. मात्र नवीन Plus प्लॅन्समध्ये प्रीमियम अनुभवावर अधिक भर असेल.
Meta ने केवळ सोशल मीडिया अॅप्ससाठीच नाही, तर Meta AI साठीही नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आणले आहेत. Meta One Plus प्लॅनची किंमत 7.99 डॉलर (सुमारे 775 रुपये) दरमहा असेल. हा प्लॅन इमेज तयार करणे, व्हिडिओ तयार करणे आणि जास्त AI वापर करणाऱ्या यूजर्ससाठी उपयुक्त ठरेल.
तर Meta One Premium प्लॅनची किंमत 19.99 डॉलर (सुमारे 1,939 रुपये) ठेवण्यात आली आहे. यात अतिरिक्त प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. तरीही Meta AI चा मोफत वापर सुरू राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र जास्त वापर करणाऱ्या यूजर्सना एका ठराविक मर्यादेनंतर पेड प्लॅन घ्यावा लागू शकतो.
Meta ने कंटेंट क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठीही स्वतंत्र सब्सक्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. Meta One Essential प्लॅनची किंमत 14.99 डॉलर (सुमारे 1,454 रुपये) आहे. यामध्ये व्हेरिफिकेशन, प्रोफाइल लिंक पर्याय आणि विविध प्लॅटफॉर्मवर स्वतःला प्रमोट करण्याची सुविधा मिळेल.
तर Meta One Advanced हा प्लॅन इन्फ्लुएंसर्स आणि व्यवसायांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यात Facebook Feed आणि Search Results मध्ये अधिक प्राधान्य, जास्त Reach आणि काही खास प्रमोशनल फीचर्स मिळतील.
एकूणच पाहता, Meta आता सोशल मीडिया वापरण्याचा अनुभव ‘फ्री’ आणि ‘प्रीमियम’ अशा दोन स्तरांमध्ये विभागण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मात्र भारतात या प्लॅनची अंतिम किंमत आणि उपलब्धता कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.