Meta AI news 
तंत्रज्ञान

Meta AI news: रील्स प्रेमींसाठी खुशखबर ! Metaच्या नवीन फीचरमुळे हिंदीत ऐकता येणार परदेशी व्हिडीओ

Meta Update news: Meta AI चा धमाका! फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्सचं आता हिंदीमध्ये ऑटोमॅटिक भाषांतर आणि डबिंग

पुढारी वृत्तसेवा

मेटाने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील रील्ससाठी असलेल्या आपल्या एआय (AI) ट्रान्सलेशन फीचरमध्ये हिंदीसह अन्य भाषांचा सपोर्ट वाढवला आहे. यापूर्वी, ऑगस्टमध्ये हे फीचर इंग्रजी आणि स्पॅनिश या द्विभाषिक लोकांसाठी सुरू करण्यात आले होते. आता यामध्ये हिंदी आणि पोर्तुगीज या भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.

मेटाने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, “मेटा एआयच्या (Meta AI) मदतीने, क्रिएटर्स आता रील्सचे सहजपणे भाषांतर आणि डबिंग करू शकतील. यामुळे भाषिक अडथळे दूर होऊन ते त्यांचे काम जगभरातील अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील.”

कसे काम करेल हे फीचर?

हे फीचर इंस्टाग्रामवरील सर्व सार्वजनिक खात्यांसाठी (Public Accounts) आणि फेसबुकवर १,००० किंवा त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्ससाठी विनामूल्य उपलब्ध आहे. क्रिएटर्सना रील्ससाठी ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन सुरू करण्यासाठी "Translate your voice with Meta AI" हा पर्याय निवडावा लागेल आणि त्यांना ज्या भाषेत भाषांतर करायचे आहे, ती भाषा निवडायची आहे. डब केलेला व्हिडिओ तपासून पाहिल्यानंतर ते रील पोस्ट करू शकतात.

डब केलेला व्हिडिओ अधिक नैसर्गिक वाटतो

क्रिएटर्सकडे हे फीचर बंद करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या फीचरमध्ये लिप-सिंकिंग (Lip-Syncing) सुविधाही आहे. यामुळे भाषांतरित ऑडिओ क्रिएटर्सच्या ओठांच्या हालचालींशी जुळतो आणि डब केलेला व्हिडिओ अधिक नैसर्गिक वाटतो. याव्यतिरिक्त, मेटा रील्सवरील टेक्स्ट किंवा कॅप्शन स्टिकर्सचे (Text or Caption Stickers) इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याच्या फीचरवरही काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT