प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
तंत्रज्ञान

Instagram New Feature : काय सांगताय भन्नाटच...थंडीत इन्स्टा 'स्क्रोल'ची गरजच नाही! जाणून घ्या नवे फीचर कसे ऑन करावे?

इन्स्टाग्रामने सादर केले नवीन ‘ऑटो स्क्रोल’ फीचर

पुढारी वृत्तसेवा

  • फोनला टचही न करताच एकापाठोपाठ एक रील्स पाहण्‍याची सुविधा

  • रील्स पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार

  • प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टाग्राम ॲप अपडेट करणे आवश्‍यक

Instagram New Auto Scroll Feature

मुंबई : देशातील अनेक भागांत थंडीची लाट तीव्र झाली असून, सर्वत्र हुडहुडी भरणारा गारठा पसरला आहे. आता अशा कडाक्याच्या थंडीत युजर्सना रील्स पाहण्‍याचा उत्तम पर्याय इन्स्टाग्रामने सादर केला आहे. आता तुम्हाला रील्स पाहण्यासाठी सातत्याने स्क्रोल करावे लागणार नाही. जाणून घेऊया इन्स्टाग्रामच्या नव्या ‘ऑटो स्क्रोल’ फीचरबाबत (Auto Scroll Feature)...

काय आहे इन्स्टाग्रामचे ऑटो स्क्रोल फीचर?

मागील अनेक दिवसांपासून इन्स्टाग्रामच्या ऑटो स्क्रोल फीचरबाबत चर्चा होती. आता ते उपलब्ध झाले आहे. ॲप अपडेट करून तुम्ही हे फीचर मिळवू शकता. ऑटो स्क्रोल नावातूनच स्पष्ट होते की, आता यापुढे तुम्हाला सातत्याने स्क्रोल करावे लागणार नाही. हे फीचर ऑन केल्यानंतर रील्स बदलण्यासाठी तुम्हाला फोनवर स्क्रोल किंवा वरच्या बाजूला स्वाइप करण्याची आवश्यकता नाही.

फोन एका ठिकाणी ठेवून देखील रील्सचा आनंद घेता येणार

या फीचरमुळे रील्स पाहण्याचा तुमचा अनुभव पूर्णपणे बदलेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आता तुम्ही फोनला स्पर्श न करताच इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक नवीन रील्स पाहू शकता.

नवीन फीचर कसे ऑपरेट होणार?

इंस्टाग्रामवर एकदा ऑटो स्क्रोल फीचर ऑन केल्यावर, रील्स पाहताना तुम्हाला हाताच्‍या बोटाने फोनच्या स्क्रीनवर वरच्या दिशेने स्वाइप करण्याची गरज पडणार नाही. ॲपच्या सेटिंग्समध्ये ऑटो स्क्रोल फीचर ऑन केल्यास, एक रील संपल्यावर लगेच दुसरी नवीन रील सुरू होईल. यामुळे तुम्ही फोन कुठेतरी ठेवूनही रील्सचा आनंद घेऊ शकता.

ऑटो-स्क्रोल फीचर कसे ऑन कराल?

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला ते स्वतंत्रपणे ऑन करावे लागेल. त्यासाठी तुमच्या फोनमधील इन्स्टाग्राम ॲप ‘अप टू डेट’ असणे आवश्यक आहे.

  • सर्वात आधी, तुमच्या फोनच्या ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टाग्राम ॲप अपडेट करा.

  • इन्स्टाग्राम ॲप उघडा आणि कोणतीही एक रील सुरू करा.

  • रीलवर उजवीकडे दिसणाऱ्या 'लाईक', 'कमेंट' किंवा 'रिपोस्ट' करण्याच्या पर्यायांच्या खाली असलेल्या तीन 'डॉट्स' (Three Dots) वर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला ‘ऑटो स्क्रोल’ फीचरचा पर्याय दिसेल. तो ऑन (On) करा.

आता तुमच्या इन्स्टाग्राम ॲपवरील रील्स आपोआप स्क्रोल होऊ लागतील. जर फीचर ऑन केल्यानंतरही ते काम करत नसेल, तर एकदा ॲप बंद करून पुन्हा सुरू करा. त्यानंतर हे फीचर सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT