Free Hotstar Subscription Plan Canva
तंत्रज्ञान

Free Hotstar Subscription Plan | OTT प्रेमींसाठी खुशखबर! आता इतक्या कमी किमतीत मिळणर फ्री Hotstar सब्स्क्रिप्शन

Free Hotstar Subscription Plan | मोफत Hotstar पाहायचंय? हे स्वस्त रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच आहेत

shreya kulkarni

सध्या मोबाईल रिचार्जसह OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेण्याची संधी अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना देत आहेत. Jio, Airtel आणि Vi यांनी आपल्या काही निवडक डेटा प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्स्क्रिप्शन देण्यास सुरुवात केली आहे. हे प्लॅन विशेषतः 100 रुपयांपासून सुरू होतात आणि फक्त 200 रुपयांपेक्षा कमी दरातच आहेत. त्यामुळे जास्त खर्च न करता सिनेमे, वेबसिरीज आणि टीव्ही शो पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या डेटा प्लॅन्समध्ये वेगवेगळ्या वैधता आणि डेटा मर्यादा असून, त्यात ग्राहकांना 30 ते 90 दिवसांपर्यंत Disney+ Hotstar चे सब्स्क्रिप्शन फ्री दिले जाते. अशा ऑफरमुळे कमी खर्चात एंटरटेनमेंट मिळवणं शक्य झालं आहे. कोणता प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे ते खालील पॉइंट्समधून जाणून घ्या.

OTT सब्स्क्रिप्शन फ्री: आता Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसाठी वेगळी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. Jio, Airtel, आणि Vi कडून काही निवडक रिचार्ज प्लॅनमध्ये हे सब्स्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.

फक्त ₹100 पासून सुरू: हे सर्व ऑफर 100 रुपयांपासून सुरू होतात आणि 200 रुपयांपेक्षा कमी खर्चात मिळतात. यामध्ये मोबाईल व टीव्ही दोन्हीवर कंटेंट पाहण्याची सुविधा मिळते.

Jio ₹100 प्लॅन:

  • डेटा: 5GB

  • वैधता: 90 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री सब्स्क्रिप्शन – 90 दिवस

  • नंतर स्पीड: 64Kbps

Jio ₹195 प्लॅन:

  • डेटा: 15GB

  • वैधता: 90 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 90 दिवस

Airtel ₹100 प्लॅन:

  • डेटा: 5GB

  • वैधता: 30 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 30 दिवस

  • डेटा संपल्यानंतर: ₹0.50/MB

Airtel ₹195 प्लॅन:

  • डेटा: 15GB

  • वैधता: 90 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 90 दिवस

Vi ₹101 प्लॅन:

  • डेटा: 5GB

  • वैधता: 30 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 3 महिने

Vi ₹151 प्लॅन:

  • डेटा: 4GB

  • वैधता: 90 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 3 महिने

Vi ₹169 प्लॅन:

  • डेटा: 8GB

  • वैधता: 90 दिवस

  • Disney+ Hotstar फ्री – 3 महिने

सर्व प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त वैधता आणि डेटा, त्यातही फ्री OTT सब्स्क्रिप्शन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT