मुंबई : गुगलवर सहज काहीतरी शोधण्याची सवय तुम्हाला मोठ्या कायदेशीर अडचणीत आणू शकते. तुमच्या प्रत्येक सर्चवर सायबर पोलिसांची नजर असून, काही विशिष्ट आणि संशयास्पद शब्द शोधल्यास तुमच्याविरुद्ध ते पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
तपास यंत्रणा तुमच्या गुगल सर्च हिस्ट्रीचा डेटा तपासू शकते. त्यामुळे इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुढील बाबींबाबत सर्च टाळा.
यामध्ये बॉम्ब बनवण्याच्या पद्धती किंवा हत्यारांची माहिती शोधणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच ड्रग्ज किंवा इतर अमली पदार्थांशी संबंधित माहिती शोधल्यास कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते.
याशिवाय बाल लैंगिक शोषण किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित कंटेंटबद्दल सर्च केल्यास शिक्षा आणि दंड होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा संस्थेविरुद्ध अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण माहिती शोधत असाल तर ते सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येते.
महत्त्वाचे म्हणजे बनावट नोटा, बँकिंग फ्रॉड किंवा हॅकिंगच्या शोधलेल्या युक्त्या तुम्हाला थेट कारागृहाची वारी घडवू शकतात. अनेकदा केवळ कुतूहलापोटी केलेल्या सर्चमुळेही लोकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
लक्षात ठेवा, इंटरनेटचा वापर माहिती आणि ज्ञानासाठी करा. कारण एक चुकीचा सर्च तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.