टेक न्यूज: गुगलने भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. आता १८ वर्षांवरील कॉलेज विद्यार्थ्यांना गुगलचे सर्वात शक्तिशाली AI टूल 'Gemini Advanced' तब्बल एका वर्षासाठी पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, संशोधन आणि नोकरीच्या तयारीसाठी मोठी मदत होणार आहे.
गुगलने 'Gemini for Students' नावाची ही खास योजना आणली आहे. साधारणपणे, Gemini Advanced वापरण्यासाठी 'गुगल वन एआय प्रीमियम' प्लॅन विकत घ्यावा लागतो, पण विद्यार्थ्यांना ही सुविधा आता विनाशुल्क मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत गुगलच्या https://gemini.google/students/?hl=en-IN या अधिकृत पेजवरून नोंदणी करावी लागेल.
आजकाल विद्यार्थी अभ्यासासाठी आणि करिअरच्या तयारीसाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. गुगलच्या मते, या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. योग्य साधने आणि संसाधने मिळाल्यास विद्यार्थी अधिक चांगल्या आणि वेगाने शिकू शकतील, असा कंपनीचा विश्वास आहे.
गुगल आणि कंतार (Kantar) यांच्या एका अहवालानुसार, भारतातील ७५% लोकांना असे वाटते की त्यांना दररोज शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी एका साधनेची गरज आहे. गुगलचा जेमिनी चॅटबॉट ही गरज पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, भारत हा अशा पहिल्या काही देशांपैकी एक आहे जिथे गुगलने विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. थोडक्यात, गृहपाठ पूर्ण करण्यापासून ते नोकरीसाठी बायोडाटा बनवण्यापर्यंत, 'जेमिनी फॉर स्टुडंट्स' हे आधुनिक विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल मित्र म्हणून काम करेल.
या मोफत प्लॅनमध्ये विद्यार्थ्यांना अनेक आधुनिक सुविधा मिळतील, ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक सोपा आणि प्रभावी होईल.
Gemini 2.5 Pro: गुगलचे सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल, जे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देण्यास, निबंध लिहिण्यास किंवा कोडिंगमध्ये मदत करेल.
Unlimited study help (अभ्यासात अमर्याद मदत) : परीक्षेची तयारी, गृहपाठ, प्रकल्प आणि मुलाखतीच्या तयारीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
NotebookLM: अभ्यासाच्या नोट्स व्यवस्थित लावण्यास आणि त्यांचा सारांश (summary) काढण्यास मदत करणारे हे एक खास टूल आहे. याची वापर मर्यादा ५ पटीने वाढवून मिळेल.
Gemini Live: विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्यासाठी व वैयक्तिक शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल.
Veo 3: प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्टसाठी AI व्हिडीओ तयार करणारे हे टूल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उपयोगी ठरेल.
Deep Research Tools: या पर्यायामुळे शैक्षणिक कामासाठी उच्च दर्जाचे स्रोत शोधणं सोपं होणार आहे.
Gmail, Docs, Sheets: या टूलच्या माध्यमातून अभ्यास साहित्याचेा सुलभ वापर , लेखन व संपादन करणे शक्य आहेय
2 TB क्लाउड स्टोरेज: गुगल ड्राईव्ह, जीमेल आणि फोटोजवर तब्बल 2 TB जागा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन्स आणि फाइल्स सहज सेव्ह करू शकाल.
इतर गुगल ॲप्ससोबत इंटिग्रेशन: जीमेल, डॉक्स, शीट्स यांसारख्या ॲप्समध्येही जेमिनीचे फीचर्स वापरता येतील, ज्यामुळे लिहिणे आणि एडिटिंग करणे सोपे होईल.