Gmail  
तंत्रज्ञान

जीमेलचं स्टोरेज भरलंय? एकाच झटक्यात मेल्स डिलीट करण्याचा स्मार्ट उपाय

सतत येणारे प्रमोशनल मेल्स, ऑनलाइन खरेदीच्या रिसीट्स, न्यूजलेटर्स, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स यामुळे मेलबॉक्स पटकन भरतो.

shreya kulkarni

गुगल आपल्या जीमेल वापरकर्त्यांना १५ जीबी मोफत स्टोरेज देते. हेच स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही ठिकाणी शेअर केलं जातं. त्यामुळे सतत येणारे प्रमोशनल मेल्स, ऑनलाइन खरेदीच्या रिसीट्स, न्यूजलेटर्स, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स यामुळे मेलबॉक्स पटकन भरतो. अनेकदा स्टोरेज फुल अलर्ट दिसू लागतो आणि अगदी महत्त्वाच्या मेलची वाट पाहत असतानाच ही समस्या डोकेदुखी ठरते.

प्रत्येक मेल वेगवेगळा डिलीट करणं वेळखाऊ आहे, पण जीमेलमध्ये असलेले सर्च क्वेरी आणि बल्क डिलीट ऑप्शन वापरले, तर काही मिनिटांत हजारो मेल्स डिलीट करून स्टोरेज मोकळं करता येऊ शकतं.

प्रमोशनल ईमेल्स एकत्र डिलीट करण्याची सोपी पद्धत

  1. ब्राउझरमध्ये Gmail उघडा आणि Inbox मध्ये जा.

  2. वरच्या सर्च बारमध्ये “Unsubscribe” टाईप करून एंटर दाबा.

  3. यामुळे तुमच्या इनबॉक्समधील प्रमोशनल व न्यूजलेटर मेल्स समोर येतील.

  4. वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करून सर्व मेल्स सिलेक्ट करा.

  5. नंतर Trash (कचरापेटी) आयकॉनवर क्लिक करून ते डिलीट करा.

  6. जर “Select all conversations that match this search” असा पर्याय दिसला, तर त्यावर क्लिक करून हजारो मेल्स एकाच वेळी डिलीट करता येतील.

  7. हाच उपाय Promotions, Social किंवा Updates टॅबमधील मेल्ससाठीही वापरता येतो.

निवडक मेल्स कसे डिलीट कराल?

कधी कधी आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे मेल्स किंवा ठराविक काळातील मेल्स काढायचे असतात. यासाठी Gmail मध्ये सर्च क्वेरी वापरता येतात:

  • एखाद्या विशिष्ट पाठवणाऱ्याकडून आलेले मेल्स:
    from:sender_email_address

  • एखाद्या विशिष्ट व्यक्तीला तुम्ही पाठवलेले मेल्स:
    to:sender_email_address

  • ठराविक तारखेनंतर आलेले मेल्स:
    after:2023-11-01

डिलीट केलेले मेल्स परत मिळवता येतात का?

होय. जर चुकून तुम्ही महत्त्वाचा मेल डिलीट केला, तरी काळजी करण्याची गरज नाही. Gmail मध्ये डिलीट केलेले सर्व मेल्स Trash फोल्डरमध्ये ३० दिवस राहतात. या काळात ते सहजपणे Restore करता येतात. मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कुठूनही हा पर्याय वापरता येतो.

जर तुमचं Gmail सतत फुल होत असेल, तर या टिप्स वापरून तुम्ही काही मिनिटांत हजारो मेल्स डिलीट करू शकता. त्यामुळे महत्त्वाच्या मेल्ससाठी नेहमी जागा मोकळी राहील आणि Gmail वापरण्याचा अनुभव सोपा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT