BSNL 1 Rupee Plan Pudhari
तंत्रज्ञान

Freedom Plan: फक्त 1 रुपयात 30 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा; ग्राहकांसाठी भन्नाट प्लॅन पुन्हा सुरू

BSNL 1 Rupee Plan: BSNL ने ग्राहकांच्या मागणीनुसार रुपये १ चा ‘फ्रीडम प्लॅन’ पुन्हा सुरू केला आहे. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, १०० SMS आणि दररोज २GB डेटा मिळतो.

पुढारी वृत्तसेवा

BSNL 1 Rupee Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. ‘फ्रीडम प्लॅन’ नावाचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा सुरू करण्यात आला असून, फक्त १ रुपयात डेटा, कॉलिंग आणि SMS सारख्या सेवा देण्यात येत आहेत. ग्राहकांच्या मागणीनंतर हा प्लॅन पुन्हा आणण्यात आला आहे.

हा प्लॅन मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून, ग्राहकांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. कमी खर्चात जास्त सुविधा मिळाल्यामुळे हा प्लॅन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना नवीन सिम कार्डसह ३० दिवसांची वैधता मिळते. विशेष म्हणजे, फक्त १ रुपयात हे सर्व मिळत असल्याने हा प्लॅन अनेकांसाठी आकर्षक ठरत आहे. ज्यांना दुसरा नंबर हवा आहे किंवा नवीन नेटवर्क ट्राय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

फ्रीडम प्लॅनअंतर्गत ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज १०० SMS देखील मोफत मिळतात, जे कोणत्याही नेटवर्कवर पाठवता येतात.

डेटाच्या बाबतीतही हा प्लॅन मागे नाही. दररोज 2GB डेटा मिळत असल्यामुळे इंटरनेट ब्राउझिंग, सोशल मीडिया वापर, YouTube व्हिडिओ किंवा Instagram रील्स पाहण्यासाठी हा डेटा पुरेसा आहे.

या प्लॅनची वैधता सिम कार्ड अॅक्टिव्ह झाल्यानंतर सुरू होते आणि ३० दिवस चालते. एकूणच, अत्यंत कमी किमतीत जास्तीत जास्त सुविधा देणारा हा प्लॅन सध्या ग्राहकांमध्ये चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT