Best mobile phones Pudhari Photo
तंत्रज्ञान

15 हजारांत स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? 'हे' आहेत बेस्ट पर्याय

Best mobile phones: दमदार बॅटरी, जबरदस्त फीचर्स 'हे' आहेत सर्वोत्तम स्मार्टफोन्स

मोनिका क्षीरसागर

टेक डेस्क : आजच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोन हा आपला अविभाज्य सोबती बनला आहे. मात्र, सततच्या वापरामुळे फोनची बॅटरी लवकर संपते आणि चार्जिंगची कटकट वाढते. जर तुम्हीही मोठ्या बॅटरीचा आणि चांगल्या फीचर्सचा फोन शोधत असाल, पण बजेट कमी असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही उत्कृष्ट स्मार्टफोन्सची माहिती घेऊन आलो आहोत, जे 6000mAh किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या बॅटरीसह येतात.

आता दमदार बॅटरीसाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सॅमसंग, मोटोरोला, विवो, रियलमी आणि रेडमी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी बजेट सेगमेंटमध्येही ग्राहकांना उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये Samsung Galaxy M35 5G, vivo T4x 5G, Motorola G64 5G, Realme NARZO 80x 5G आणि Redmi 10 Power सारखे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही यापैकी एका फोनची निवड करू शकता.

Samsung Galaxy M35 5G

ग्राहक हा स्मार्टफोन आत्ताच Flipkart वरून 13 हजार 488 रुपयांना खरेदी करू शकतात. या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी, 50MP प्रायमरी रिअर कॅमेरा, 6.6-इंच सॅमोलेड डिस्प्ले, Exynos 1380 प्रोसेसर आणि व्हेपर कूलिंग चेंबर सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Vivo T4x 5G

हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवरून 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6500mAh बॅटरी, 50MP + 2MP रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, डायमेन्सिटी 7300 5G प्रोसेसर, 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.72-इंच डिस्प्ले यासारख्या वैशिष्ट्यांसह येतो.

Motorola G64 5G

हा स्मार्टफोन देखील ऑनलाईन 13 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी, डायमेन्सिटी 7025 प्रोसेसर, 50MP (OIS) + 8MP रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 6.5-इंच फुल एचडी+ डिस्प्ले अशा वैशिष्ट्यांसह येतो.

Realme NARZO 80x 5G

ग्राहक सध्या कंपनीच्या साईटवरून हा फोन फक्त 12 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन 6000mAh बॅटरी, IP69 वॉटरप्रूफ रेटिंग, डायमेन्सिटी 6400 5G प्रोसेसर, मिलिटरी ग्रेड शॉक रेझिस्टन्स आणि 120Hz आय कम्फर्ट डिस्प्लेसह येतो.

Redmi 10 Power

हा स्मार्टफोन सध्या कंपनीच्या साईटवरून 12 हजार, 499 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 50MP प्रायमरी कॅमेरा, 6.71-इंच डिस्प्ले आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट अशी वैशिष्ट्ये आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT