भारतासाठी ए.आय. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे. ए. आय., सेमीकंडक्टर आणि क्वांटम याचाबत सुरू केलेल्या मोहिमांमुळे देशातील तरुणांसाठी रोजगार आणि जगभरातील गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या या काळात सुपर कॉम्प्युटर्स खूप मोठी भूमिका निभावणार आहेत. 'विकसित भारता'चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ए.आय. आणि जवतंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावेल आणि त्यामध्ये देशातील युवाशक्तीचा मोठा वाटा असेल,
भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने आपला ठसा जागतिक मंचावर अनेक वर्षापूर्वी उमटवला होता. संपुर्ण जगाला सेवा आणि उपाय देण्यात आपले भारतीय नेतृत्व करत होते, योगदान देत होते. मात्र, काही कारणास्तव भारताची जी विशाल देशांतर्गत बाजारपेठ आहे, त्याचा लाभ माहिती तंत्रज्ञान उद्योगाला मिळाला नाही. यामुळे भारतात डिजिटल दरी वाढत गेली एक प्रकारे आपण म्हणू शकतो की, दिया तले अंधेरा' असे आपल्याबाबतीत घटले होते. आमच्या सरकारची धोरणे आणि निर्णय साधीदार आहेत, की आज हा दृष्टिकोन बदलला आहे. आमचे सरकार जाणून आहे की बंधनांमध्ये भविष्यातील नेतृत्व विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच सरकारकडून तंत्रज्ञान उद्योगाला अनावश्यक नियमनांमधून, बंधनांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय डिजिटल दळणवळण धोरण हा देखील असाच एक मोठा प्रयत्न होता.
भारताला जागतिक सॉफ्टवेअर उत्पादन केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात आले. गेल्या दशकभरामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाने जी उत्पादने, जे उपाय तयार केले आहेत, त्यांना आम्ही प्रशासनात महत्वपूर्ण स्थान दिले आहे. विशेषत: डिस्टिल इंडियाने, डिजिटल तंत्रज्ञानाने सामान्यातील सामान्य भारतीयाला सशक्त केले आहे, सरकारशी जोडले आहे. आज डेटाचे लोकशाहीकरण करण्यात आले आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवली जात आहे. आज शेकडो सरकारी सेवा ऑनलाईन पुरवल्या जात आहेत. प्रशासनात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला सुविधांबरोबरच भ्रष्टाचारापासून मोठा दिलासा मिळत आहे. आपली फिनटेक उत्पादने आणि यूपीआयसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची चर्चा तर आज जगभरात होत आहे. जागतिक बँकसह सर्वच जण याच्या सामर्थ्यांची चर्चा करत आहेत. जितके डिजिटल व्यवहार जास्त होत आहेत, तेवढ्या काळ्या पैशाचे स्रोत कमी होत आहेत. गरिबाच्या हवकाचे पै न पै त्याच्यापर्यंत कोणात्याही गळतीशिवाय पोहोचू शकत आहेत.
आज जगावं वर्तमान आणि भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच, ए.आयशी जोडलं गेलं आहे. जगभरात ए. आय. ची चर्चा होत असताना भारत या क्षेत्राचे नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच वर्षी भारताने ए. आय. मिशनचा प्रारंभ केला आहे. भारताकडे आज डबल ए. आयची शक्ती आहे. एका म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरे म्हणजे अँस्पिरेशनल इंडिया. या दोन्हींची ताकद एकत्र आल्यावर विकासाची गती वाढने स्वाभाविक आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील धोरणात्मक कार्यक्रम आणि भागीदारीद्वारे आय इनोन्देशमला उत्प्रेरित करणारी सर्वसमावेशक ए. आय इनोव्हेशनला उत्प्रेरित करणारी सर्वसमावेशक इकोसिस्टिम स्थापित करण्यात येणार आहे. संगणकीय प्रवेशाचे लोकशाहीकरण करून, डेटा गुणवत्ता सुधारून, स्वदेशी ए. आय. क्षमता विकसित करुन, शीर्ष ए. आय. प्रतिभा आकर्षित करून, उयोग सहयोग सक्षम करून, स्टार्टअप्सना भांडवल प्रदान करून, सामाजिकदृष्ट्या प्रभाची ए. आय. प्रकल्पांची खात्री करून आाणि नैतिक ए. आय. ला प्रोत्साहन देऊन भारताच्या ए. आय परिसंस्थेच्या जबाबदार, समावेशक वाढीस चालना दिली जाईल. ए. आय. मिशनसाठी १०,००० कोटी रूपायांच्या योजनेची तरतूद करण्यात आली असून याचा फायदा संगणकाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि स्टार्ट अप्सना नवोपक्रमासाठी निधी आणि इतर समर्थन पुरवण्यासाठी केला जाईल. ए.आय., सेमीकंडक्टर आणि क्वांटम या तीन मोहिमांमुळे तरुणांसाठी रोजगार आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील,
आम्ही ए. आय तंत्रज्ञानाच्या क्वीन युगात आहोत आणि जगाने हे मान्य केले आहे की ए. आय. मध्ये भारताचा वरचष्मा असेल. ही संधी दवडता कामा नये, हे आमचे प्राधान्य आहे. खरंतर भारतासाठी ए. आय. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करुन जगाला डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा नवा मार्ग दाखवला आहे. डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात, है भारताने जगाला दाखवून दिले आहे तंत्रज्ञान कुणावर नियंत्रण मिजवण्याचे किया विभाजन करण्याचे नाही, तर पारदर्शकता आणि सथमीकरणाचे साधन आहे.
कृत्रिम बुद्धिमता आणि मशिन लर्निंगच्या या काळात सुपर कॉम्प्युटर्स खूप मोती भूमिका निभावणार आहेत, ज्याप्रमाणे आज भारताने आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ५-जी नेटवर्क बनवले आहे, ज्याप्रमाणे आज मोठमोठ्या कंपन्यांचे फोन भारतात तयार केले जात आहेत. यामुळे देशाच्या डिजिटल क्रांतीला नवे पंख लाभले आहेत. आम्ही मिशन मौसम'चा देखील प्रारंभ केला आहे, ज्यामुळे 'वेदर रेडी' आणि क्लामेट स्मार्ट भारताची निर्मिती करण्याचे आपले स्वप्न सत्यात साकारता येणार आहे. सुपर कॉम्प्युटर्स आणि हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग प्रणालीसारखी जी उद्दिष्टे देशाने साध्य केली आहेत, ते देशातील गावे आति गरिबांची सेवा करण्याची माध्यमे बनतील. हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग प्रणालीच्या अवलंबामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्याची देशाची वैज्ञानिक क्षमता आणखी वृद्धिंगत होईल. आता आपण हायपर लोकल, म्हणजे, अगदी स्थानिक स्तरावर देखील हवामानाच्या संदर्भात अगदी अचूक अंदाज व्यक्त करण्यास सक्षम होऊ. म्हणजेच एक गाव किंवा त्या गावातील युवक देखील ही माहिती देऊ शकतील. सुपर कॉम्प्युटर जेव्हा एखाद्या दुर्गम भागातील खेड्यात हवामान आणि मातीचे विश्लेषण करू लागेल तेव्हा ही केवळ विज्ञानाची उपलब्धी नाही, तर हजारो-लाखो आयुष्यांमध्ये घडणारे मोठे परिवर्तन ठरेल. माझ्या देशातील छोट्यात- छोट्या गावातील शेतकऱ्यासाठी जगातील सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध होईल, हे सुपर कॉम्प्युटरमुळे सुनिश्चित होईल. छोट्या छोट्या गावांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल.
कारण, यामुळे शेतकरी आपल्या पिकांबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. याचा फायदा समुद्रावर मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांनादेखील होईल. शेतकऱ्यांना होणारे नुकसान कमी करण्याचे नवनवीन पर्यायदेखील आपण शोधू शकू. यामुळे विमा योजनेच्या विविध सुविधा मिळवण्यातदेखील मदत मिळेल. आपण याच्या मदतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग संबंधित प्रारुपे बनवू करेल हितसंबंधी गटांना मिळेल. देशात सुपर कॉम्प्युटर तयार करण्याची विद्वत्ता आपल्याकडे आहे, है, ही उपलब्धी देशातील सामान्य माणसासाठी एक अभिमानास्पद बाब तर आहेच, यामुळे आगामी काळात देशवासीयांच्या, सामान्य वर्गाच्या जीवनात मोठे बदल घडविण्याचे मार्गदेखील सापडतील.
आजच्या डिजिटल क्रांतीच्या काळात संगणकीय क्षमता राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय म्हणून उभ्या राहत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाच्या संधी, अर्थव्यवस्थेसाठी वृद्धीच्या संधी, देशाचे युद्धसामर्थ्य, आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षमता, जीवनमानातील, व्यवसाय करण्यातील सुलभता असे कोणतेही क्षेत्र असे नाही, जे थेट तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षमतेवर अवलंबून नाही, आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्री ४.० मध्ये भारताला यशस्वी होण्याचा सर्वात मोठा आधार आहे. या क्रांतीमध्ये आपला वाटा मोठा असला पाहिजे.
आजचा नवा भारत विकास आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत उर्वरित जगाची केवळ बरोबरी करून समाधानी होऊ शकत नाही. हा नवा भारत स्वतःच्या शास्त्रीय संशोधनातून मानवतेची सेवा करण्याला स्वतःची जबाबदारी मानतो. 'संशोधनातून आत्मनिर्भरता' ही आमची जबाबदारी आहे. स्वावलंबनासाठी विज्ञान हा आज आपला गुरुमंत्र बनला आहे. यासाठी आपण डिजिटल अनेक ऐतिहासिक अभियाने सुरू केली आहेत. भारतातील भविष्यात येणाऱ्या पिढ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट व्हावा यासाठी देशातील विद्यालयांमध्ये १० हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळादेखील उभारण्यात आल्या आहेत.
कोणताही देश मोठी उद्दिष्टे तेव्हाच साध्य करू शकतो, जेव्हा त्याचा दृष्टिकोन उदात्त असतो. भारताचा सुपर कॉम्प्युटरपासून क्वांटम कॉम्प्युटिंगपर्यंतचा प्रवास, ए. आय. मिशन हे याच उदात्त दृष्टिकोनाचे फलित आहे. एके काळी सुपर कॉम्प्युटर काही मोजक्या देशांचे प्रावीण्य असल्याचे मानले जात होते. मात्र, आम्ही २०१५ मध्ये राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानाचा प्रारंभ केला आणि आज भारत सुपर कॉम्प्युटरच्या क्षेत्रात मोठ्या देशांची बरोबरी करत आहे. आपण इथेच थांबून राहणार नाहीं. क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या तंत्रज्ञानात भारत आतापासूनच आघाडीवर आहे. यामध्ये भारताला प्रगतिपथावर घेऊन जाण्यात आपल्या राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग अभियानाची महत्त्वाची भूमिका असेल. हे नवे तंत्रज्ञान आगामी काळात जग पूर्णपणे बदलून टाकेल. यामुळे माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन येईल, नव्या संधी निर्माण होतील. भारत या क्षेत्रात संपूर्ण जगाला नवी दिशा दर्शवण्याच्या विचाराने पुढे वाटचाल करत आहे.
ए. आय. च्या प्रभावापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही. मानवतेच्या मूलभूत घटकांचे रक्षण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मात्र, त्याच्या वापराबाचत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ए.आय. सुसज्ज शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली तर त्यामुळे जागतिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता जागतिक समुदायाला नैतिक मूल्यांवर आधारित ए. आय. साठी एकमत फ्रेमवर्क तयार करावे लागेल. डीफफेक, डेटा चोरी, सायबर सुरक्षा यासारख्या समस्या कोणत्या प्रकारची आव्हाने निर्माण करू शकतात, हे दर्शवित आहेत. भारताच्या नेतृत्वाखालील जी-२० शिखर परिषदेत तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात ए.आय. संदर्भात जे काही सांगण्यात आले आहे, त्याबाबत आता पुढे जाण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देशांदरम्यान जागतिक करार आहेत, त्याच धर्तीवर ए. आय. बावत जागतिक आराखडा तयार करण्याची गरज आहे. यामध्ये अतिसंवेदनशील ए. आय. च्या वापराबाबत जागतिक कराराचादेखील समावेश असणे गरजेचे आहे.