ॲपलने ९ सप्टेंबर रोजी आयफोन १६ सीरीजमधील मॉडेल्स लाँच करण्याची तयारी केली आहे. (file photo)
तंत्रज्ञान

Apple iPhone 16 सीरीजमधील मॉडेल्सच्या किमती लीक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

ॲपलने ९ सप्टेंबर रोजी आयफोन १६ सीरीजमधील मॉडेल्स लाँच करण्याची तयारी केली आहे. या इव्हेंटमध्ये आयफोन १६, १६ प्लस. १६ प्रो आणि १६ प्रो मॅक्स हे मॉडेल्स लाँच केले जाऊ शकतात. Apple ने iPhone 16 लाँच इव्हेंटला It’s Glowtime असे नाव दिले आहे. हा लाँच इव्हेंट Apple Park वरून प्रसारित केला जाणार असून भारतात हा रात्री १०:३० वाजता पाहता येईल. हा इव्हेंट Apple.com आणि YouTube वर अथवा Apple TV ॲपवर ऑनलाइन पाहता येईल, असे वृत्त financial express ने दिले आहे.

इतर प्रत्येक नवीन iPhone सीरीजप्रमाणे, Apple दोन्ही iPhone 16 आणि iPhone 16 Plus या बेस मॉडेल्ससाठी तसेच iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मॉडेल्ससाठी अनेक नवीन अपग्रेड्स सादर केले जाणार असल्याची शक्यता आहे.

iPhone 16 आणि 16 Plus मध्ये नवीन काय?

iPhone 16 आणि 16 Plus मध्ये कोणतेही मोठे बदल दिसणार नाहीत. दोन्ही मॉडेल्समध्ये एकसमान ६.१ इंच आणि ६.७ इंच स्क्रीन आकार असण्याची शक्यता आहे. आयफोन १५ आणि १५ प्लस प्रमाणेच हे असेल. दोन्ही मॉडेल्सना वेगवान A१८ प्रोसेसर आणि मेमरी ६GB ते ८GB पर्यंत वाढवली आहे. मेमरी वाढ ही Apple इंटेलिजेन्स सारख्या प्रगत फिचर्सना सपोर्ट देण्यासाठी डिझाइन केली आहे. आयफोन ११ पासून आयफोन डिझाईनमध्ये फारसा काही बदल झालेला नाही. आयफोन १६ सीरीज एकूणच सारखी असण्याची शक्यता आहे.

iPhone 16 प्री-ऑर्डर कधीपासून?

नवीन आयफोन मॉडेल्स लाँच झाल्यानंतर लवकरच ते प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील आणि २० सप्टेंबरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

Apple iPhone 16 ची किंमत काय असेल?

Apple iPhone 16 सीरीजमधील आगामी फोनची किंमत Apple Hub द्वारे ऑनलाइन लीक झाली आहे. काही रिपोर्टच्या हवाल्याने द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, iPhone 16 ची किंमत ७९९ डॉलर (सुमारे ६६,३०० रुपये) आणि iPhone 16 Plus मॉडेलची सुरुवातीची किंमत ८९९ डॉलर (सुमारे ७४,६०० रुपये) असू शकते. iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची किंमत १,०९९ डॉलर (सुमारे ९१,२०० रुपये) आणि iPhone 16 Pro Max ची सुरुवातीची किंमत १,१९९ डॉलर (सुमारे ९९,५०० रुपये) असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT