Apple च्या बहुप्रतिक्षित इव्हेंटमध्ये यंदा iPhone 17 सीरिजसोबतच Apple Watch SE 3 लाँच करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मुलांच्या सुरक्षिततेसाठी खास Kids Tracker Feature देण्यात आलं आहे.
हे वॉच LTE कनेक्टिव्हिटीसह येणार आहे. म्हणजेच आता पालकांना त्यांच्या मुलांचं लोकेशन रिअल टाइममध्ये ट्रॅक करता येणार आहे. मुलं शाळेत गेली असोत, क्लासला असोत किंवा बाहेर खेळायला गेली असोत हे वॉच त्यांच्या हालचालींची माहिती थेट पालकांच्या मोबाईलवर देईल.
फक्त ट्रॅकिंगच नाही तर या वॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेसशी निगडित बरेच अपग्रेड फीचर्स आहेत. हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि विविध सेफ्टी अलर्ट्स या घड्याळात मिळणार आहेत. त्यामुळे ही वॉच मुलं आणि प्रौढ अशा दोघांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.
Apple ने यासोबत Apple Watch Series 11 आणि Apple Watch Ultra 3 देखील बाजारात आणल्या आहेत. पण तरीही लक्ष वेधून घेतलं ते मुलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या नवीन Kids Tracker Feature ने.
तज्ज्ञांच्या मते, शहरांमध्ये वाढत्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करता हा फीचर पालकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल. आपल्या मुलं कुठे आहेत याची थेट माहिती मिळणं ही आजच्या काळात अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि Apple Watch SE 3 हे काम अधिक सोपं करणार आहे. म्हणजेच, तंत्रज्ञानाच्या मदतीने आता मुलांची सुरक्षितता आणखी बळकट होणार आहे.