Google ने आपला नवीन Android 16 Beta अपडेट रिलीज केला आहे, ज्यामध्ये एक नव्या प्रकारचा Material Expressive UI डिझाईन समाविष्ट आहे. हा इंटरफेस आधीच्या Material You डिझाईनचा अपग्रेडेड व्हर्जन आहे, जो या महिन्यात पार पडलेल्या Android Show दरम्यान सादर करण्यात आला होता. हा अपडेट त्याच यूझर्ससाठी आहे जे Android 16 Beta प्रोग्राममध्ये पहिल्या दिवसापासून सामील आहेत. सध्या हा अपडेट सिलेक्टेड डिव्हाइसेससाठी रोलआउट केला जात आहे.
जर आपण सपोर्टेड डिव्हाइस वापरत असाल, तर हे सोपे स्टेप्स फॉलो करून Android 16 Beta अपडेट इंस्टॉल करू शकता:
फोनची Settings उघडा
खाली स्क्रोल करून System सेक्शनमध्ये जा
Software updates वर टॅप करा
Android 16 QPR1 Beta अपडेट दिसेल
ते डाउनलोड करा आणि फोन रीस्टार्ट करा
रीस्टार्ट केल्यानंतर तुमचे डिव्हाइस नवीन Material Expressive UI ने सुसज्ज होईल
सध्या Android 16 Beta केवळ Pixel डिव्हाइसेससाठी उपलब्ध आहे:
Pixel 6, 6 Pro, 6a
Pixel 7, 7 Pro, 7a
Pixel 8, 8 Pro, 8a
Pixel Fold
Pixel 9, 9 Pro, 9 Pro XL
Pixel 9 Pro Fold
Pixel 9a
Google चा दावा आहे की या नवीन UI मध्ये यूझर्सना अधिक स्मूथ अॅनिमेशन्स आणि फ्लूइड इंटरफेस मिळेल. लॉक स्क्रीनवर आता Live Activities सारखे रिअल-टाईम अपडेट्स मिळतील जसे की तुमची कॅब किंवा फूड डिलिव्हरीचा स्टेटस.
याशिवाय, यूआयमध्ये मिळतील:
नविन कर्वी आयकॉन्स आणि फ्रेश फॉन्ट स्टाईल
सेटिंग्ज मेन्यूमध्ये वेगळ्या सेक्शनसाठी नवीन कलर टोन
होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीन कस्टमाइज करण्यासाठी नविन स्टाईल सेक्शन
नोटिफिकेशन डिस्प्लेमध्ये बदल
Google जूनपर्यंत या QPR1 Beta ला स्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून Android 16 चा पब्लिक वर्जन वेळेवर रिलीज करता येईल. सध्याच्या अपडेट्सचा वेग पाहता असं वाटतं की Pixel सीरीजच्या नवीन डिव्हाइसेसना हा Android वर्जन डिफॉल्ट स्वरूपात मिळू शकतो.