श्रावण महिना सुरू झाला की घराघरांत भक्तिभावाचं वातावरण आणि उपवासांची तयारी सुरू होते. विशेषतः श्रावण सोमवार, म्हणजे भगवान शंकराला अर्पण केलेला दिवस. पण प्रत्येक सोमवारी तेच-तेच साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी आणि थालीपीठ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल ना? तर मग या श्रावणात काही नवे, हटके आणि चविष्ट पर्याय ट्राय का करू नयेत? हे पर्याय उपवासाला योग्य आहेत आणि चवीलाही जबरदस्त तडका देतात!
राजगिऱ्याच्या पिठात दही, जिरे, हिरवी मिरची आणि थोडं मीठ घालून बनवा पौष्टिक आणि मऊसर पॅनकेक. वरून थोडं साजूक तूप आणि कोथिंबीर टाका, मस्त नाश्ता तयार.
रताळे उकडून त्यात तीखट मिरची, शेंदाडा पीठ, कोथिंबीर आणि सैंधव मीठ टाका. छोटे छोटे गोळे करून साजूक तुपात तळा. कुरकुरीत आणि झणझणीत!
दूध, खवा आणि किसलेला नारळ याचा वापर करून तयार करा उपवासासाठी योग्य आणि चवदार नारळ लाडू. त्यात अंजीराचे बारीक तुकडे टाकून एक नवा फ्युजन गोड प्रकार करा.
साबुदाणा भिजवून, बटाट्याचा कीस घालून तयार करा पिठासारखा गोळा. लाटून तव्यावर पराठ्यासारखा भाजा. वरून साजूक तुपाचा तडका! झकास लागतो.
उपवासात खाल्ली जाणारी फळं – पेरू, सफरचंद, केळं, डाळिंब यामध्ये लिंबाचा रस, सैंधव मीठ, जिरे पूड टाका. मसालेदार आणि हेल्दी स्नॅक!
राजगिऱ्याच्या पिठाचा बेस तयार करा, वरून बटाटा, टोमॅटो (परवानगी असल्यास), मिरची, आणि चीज टाका. ओव्हनमध्ये बेक करा आणि तयार उपवास पिझ्झा!
साबुदाणा, दही आणि शिंगाडा पीठ यांचं मिश्रण करून फर्मेंट करून ढोकळा वाफवून घ्या. वरून मिरची आणि मोहरीचं फोडण. नवा आणि झणझणीत पर्याय!