फीचर्स

आंबा राहु दे, लिंबाची पेटी पाठवून द्या, भाववाढीनंतर लिंबावरचे मीम्स व्हायरल…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळ्यात अंगांची होणारी लाहीलाही शमवण्यासाठी थंड पेये तसेच सरबताला प्राधान्य देण्यात येते. मागणीत वाढ झाल्‍याने लिंबू, संत्रे आणि मोसंबीचे दरही वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे दर गगनाल भिडले आहेत. यानंतर सोशल मीडीयावर लिंबाच्या भाववाढीवर अनेक मीम्‍स व्हायरल झाले आहेत.

 लिंबांचे भाव वाढल्यानंतर सोशल मीडीयावर मीम्सचा पाऊस पडत आहेत. अनेकांनी लिंबाच्या भाववाढीवर मीम्स बनवले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या रॉयच्या कच्चा निंबुडा या गाण्यातील सीनचा वापर करत मीम्स बनवले जात आहेत. यामध्ये सचिन खेडेकर यांनी एका मराठी सिनेमात केलेल्या संवादाचा वापर केला जात आहे. शिवाय मकरंद अनासपुरेच्या डायलॉग्सचा आधार घेतही मीम्स बनवले जात आहेत.

शनिवार पासून बाजारात बरेचसे ग्राहक फळे खरेदी करताना दिसत होते. लिंबू, संत्रे, मोसंबी यांसह कलिंगडाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, आवक कमी असल्याने याचे दर प्रचंड वाढले आहेत. एरव्ही 10 रुपयांना मिळणारी चार लिंबू  20 रुपयांना तीन या प्रमाणे मिळत आहेत.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT