Ramadan 2026 : खजूर खाऊन का सोडला जातो 'रोजा'? वाचा एक्सपर्ट्सनी सांगितलेले मोठे फायदे... file photo
फीचर्स

Ramadan 2026 : खजूर खाऊन का सोडला जातो 'रोजा'? वाचा एक्सपर्ट्सनी सांगितलेले मोठे फायदे...

Ramadan 2026: तुम्ही कधी विचार केला आहे का की रमजानमध्ये रोजा खजूर खाऊनच का सोडला जातो?

पुढारी वृत्तसेवा

ramadan 2026 why muslims break ramadan fast with dates khajur health benefits

पुढारी ऑनलाईन :

Ramadan 2026: तुम्ही कधी विचार केला आहे का की रमजानमध्ये रोजा खजूर खाऊनच का सोडला जातो? ही केवळ धार्मिक परंपरा आहे की यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

मेडिकल सायन्स काय सांगते?

मेडिकल सायन्सनुसार, खजूरामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. रोजा उघडताच ते शरीराला झटपट ऊर्जा देतात, गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी करतात आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

अभ्यास काय सांगतो?

National Library of Medicine मधील एका अभ्यासानुसार, खजूराचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी ते मध्यम असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो.

तसेच खजूरामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे सूज कमी करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

एक्सपर्ट काय म्हणतात?

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट Rujuta Diwekar यांचे म्हणणे आहे की, खजूर शरीरातील हिमोग्लोबिन (Hb) आणि एनर्जी लेव्हल वाढवण्यास मदत करतो. तो झोपेशी संबंधित समस्या कमी करतो, संसर्ग व अ‍ॅलर्जीशी लढण्यास मदत करतो आणि एक्सरसाइज परफॉर्मन्स सुधारतो.

याशिवाय खजूर बद्धकोष्ठता (कब्ज) आणि अ‍ॅसिडिटीपासूनही दिलासा देतो. 2018 मध्ये त्यांनी सांगितले होते की, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनीही खजूर खायला हवा, कारण तो शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो.

महिलांसाठीही खजूर उपयुक्त असून, पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना व आकडी (क्रॅम्प्स) कमी करण्यात तो फायदेशीर ठरतो.

खजूर खाण्याचे इतर फायदे

खजूरामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. हे पोषक घटक रोजा सोडल्यानंतर शरीराला ऊर्जा देतात आणि अशक्तपणा दूर करतात.

खजूरामध्ये पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने दिवसभर पाणी न मिळाल्यानंतर शरीराला हायड्रेशन मिळते. त्यातील नैसर्गिक साखर सहज पचते, त्यामुळे रोजा सोडल्यानंतर पोटावर जडपणा येत नाही.

फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, कब्ज टाळता येतो, तर अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात.

रोजात खजूर कसा खावा?

खजूर थेट खाऊ शकता

पाण्यात भिजवून घेऊ शकता

दूधासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळूनही खाऊ शकता

यामुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते.

त्यामुळे रोजा खजूराने सोडणे ही केवळ परंपरा नसून, त्यामागे ठोस वैज्ञानिक कारणेही आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT