Muslim Funeral Rituals  Chat GPT
फीचर्स

Muslim Funeral Rituals | इस्लाममध्ये मृतदेह दहन करण्यास का आहे मनाई? जाणून घ्या कारण

Muslim Funeral Rituals | मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराची पद्धत वेगवेगळी असते. हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी देतात, तर इस्लाम धर्मात मृतदेह दफन केला जातो.

पुढारी वृत्तसेवा

Muslim Funeral Rituals

मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराची पद्धत वेगवेगळी असते. हिंदू धर्मात शवाला अग्नी देतात, तर इस्लाम धर्मात मृतदेह दफन केला जातो. पण मुस्लिम समाजात मृतदेह का दहन का केला जात नाही? यामागे महत्त्वाची धार्मिक श्रद्धा आणि कारणे आहेत.

मृत्यूपूर्वी काय केले जाते?

इस्लामची जीवनपद्धती, या पुस्तकातील संदर्भानुसार एखादी व्यक्ती मृत्यूच्या जवळ आली की कुराण वाचन करणाऱ्या विद्नानाला बोलावले जाते. त्याला कुराणातील छत्तिसावे प्रकरण वाचायला सांगितले जाते. यास ‘कलिमा’ असे म्हणतात. कलिमा म्हणजे ईश्वर हा एकमेव आहे. 

मृत्यूनंतर काय केले जाते?

मृत्यूनंतर शवाला स्नान घातले जाते. शवाचे डोळे आणि तोंड बंद करून देहाला पांढऱ्या स्वच्छ कपड्याने झाकले जाते. इतर देशांमध्ये हिरव्या कपड्याने झाकले जाते.

मृतदेह कसा दफन केला जातो?

नमाज झाल्यावर मृतदेह कब्रस्तानात नेला जातो. इस्लामी परंपरेनुसार कबरीत मृतदेह किब्ल्याकडे म्हणजे मक्केकडे तोंड करून ठेवला जातो. कबर मातीने भरली जाते आणि त्यावर ओळखण्यासाठी दगड अथवा त्या व्यक्तीच्या नावाचे फलक ठेवले जाते.

इस्लाममध्ये दहन का निषिद्ध आहे?

  • शरीर अल्लाहची देणगी आहे – दहन करणे म्हणजे त्याचा अपमान मानला जातो.

  • आग म्हणजे यातना – इस्लाममध्ये अग्नीचा संबंध जहन्नमशी (नरक) जोडला आहे. मृतदेह दहन करणे म्हणजे आत्म्याला वेदना देणे असे मानले जाते.

  • पुनरुत्थानाची श्रद्धा – इस्लामनुसार कयामतच्या दिवशी अल्लाह प्रत्येकाला पुन्हा जिवंत करेल. म्हणून मृतदेह मातीत परत देणे ही श्रद्धेची खूण आहे.

येथे दिलेली माहिती ही केवळ धार्मिक श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. पुढारी कोणत्याही प्रकारच्या श्रद्धा, धार्मिक माहिती किंवा विधींची शास्त्रीय पुष्टी करत नाही. दिलेली माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणतेही धार्मिक नियम किंवा परंपरा प्रत्यक्षात पाळण्यापूर्वी संबंधित धर्मगुरू, तज्ञ किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT