मां को सब पता है ; मुलाला रागावण्यासाठी आईने केला चक्कChat GPTचा वापर Pudhari
फीचर्स

Mother’s Day Special: मां को सब पता है ; मुलाला रागावण्यासाठी आईने केला चक्कChat GPTचा वापर

Reddit वर एका मुलाने हा किस्सा शेअर केला आहे.

अमृता चौगुले

Happy Mother's Day

मां तो मां होती है असा फिल्मी डायलॉग आपण प्रत्येकाने एकदा तरी ऐकला असतोच. अगदी सिनेमातल्या सारखी गाजर का हलवा बनवणारी फिल्मी नसली तरी मेलोड्रामा करणाऱ्या आईपेक्षा कमी नसते.

अनुभव घ्यायचाच तर एकदा आईने लादी पुसलेल्या फरशीवरुन चालून तर बघा... किंवा आईने स्वयंपाक केला असताना बाहेरून मस्त चायनीज खाऊन घरी जावा... आईचा नवा रुद्रावतार पाहायला मिळेल यात शंका नाही. हेच जेव्हा काही काम करवून घ्यायचे असेल तर आई इतके गोड बोलून मस्का कुणीच मारत नाही.

आपण अनेकदा कांड करतो, ते लपवण्यासाठी भावंडांची मदत घेतो. पण म्हणतात ना मां तो मां होती है, उसको सब पता होता है.... असाच किस्सा एका पठ्ठ्यासोबत घडला, नुसता घडलाच नाही तर व्हायरलही झाला. तुमच्या आमच्या सारख्याच एका gen Z पठ्ठ्याने आईला चॅट जीपीटी शिकवले. आता त्याला काय माहिती गुरुजी विद्या गुरूलाच एकेदिवशी वापरली जाईल.

Reddit वर एका मुलाने हा किस्सा शेअर केला आहे.

आईला chat gpt वापरायला शिकवले आणि माझ्यासोबत असे घडले.... अशी सुरुवात करत तो पुढे म्हणतो. मी फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायला विसरलो. आईने यावर मला रागवले. ते रागावणे यासाठी वेगळे होते कारण आईने चक्क chat gpt ची मदत घेऊन मला मेसेज केला होता.

या मेसेज मध्ये लिहिले होते, तू पाण्याची बाटली फ्रिजमध्ये भरून ठेवण्यासाठी पुन्हा विसरलास. तुला किती वेळा सांगितले आहे पाणी पिल्यानंतर रिकामी बाटली भरून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची. परंतु तू सतत विसरतोस. इतका निष्काळजीपणा योग्य नाही.

हा मेसेज व्हायरल होताच युजर्सनी त्यावर भन्नाट कमेंट करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक जण म्हणतो, चॅट जी पी टी आता मम्मीच्या हातात आल्यावर काही खरे नाही. तर दुसरी युजर म्हणते, देसी मम्मी ने चॅट जी पी टी वापरायला सुरू केल्यावर तर मजाच येईल.

Gen Z आणि Millenials हे सध्याच्या Chat GPT चा वापर करण्यात सगळ्यात पुढे आहे. पण आपले सर्वांचे आई- वडीलही सोशल मीडिया वापरताना कुठेही कमी पडत नाहीत हे मात्र खरे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT