फीचर्स

Makar Sankranti 2023 : शनि आणि राहुच्या दोषांपासून मिळेल मुक्ती, मकर संक्रांतीला करा ‘या’ वस्तूंचे दान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्‍वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. संपूर्ण भारतात मकर संक्रांती आणि बैसाखी हे दोन सण सौर कालगणनेनुसार साजरे केले जातात. मकर संक्रांती खूप वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. हा सण सूर्य देवाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे हे संक्रमण पृथ्वीवर वातावरणात मोठे बदल घडवून आणतात. याशिवाय याचे धार्मिक महत्त्‍वही फार मोठे आहे. या दिवशी दानधर्म करणे हे फार पुण्याचे मानले जाते. विशेषकरून ज्या लोकांना शनि आणि राहुच्या साडेसातीने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा दोष मुक्ती देणारा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही विशेष वस्तूंचे दान केल्याने शनि आणि राहुच्या दोषांतून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊ त्या वस्तू कोणत्या…

उडद

मकर संक्रातीला उडदाच्या डाळीचे दान करणे शनि देवाच्या प्रकोपासून मुक्ति मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण उडद डाळीचा शनिदेवाशी संबंध मानला जातो. या दिवशी उडदाच्या डाळीची खिचडी दान केल्याने कुंडलीतील शनि दोष दूर होतात.

तिळाचे दान

मकर संक्रांतीला आपण तिळ-गुळ वाटप करतो. कारण तीळ आणि गुळ शरीरात उष्णता निर्माण करून थंडीपासून आपले बचाव करतात. मात्र याच तिळाचे मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने देखील शनि दोष दूर होतात,अशी धार्मिक मान्यता आहे.

ब्लँकेट/घोंगडी

शास्त्रामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट दान करणे देखील खूप फलदायी मानले गेले आहे. या दिवशी ब्लँकेट किंवा घोंगडी दान केल्यास राहु दोष दूर होतो असे मानले जाते.

( वरील माहिती ज्‍योतिषशास्‍त्र व श्रद्धेवर आधारित आहे. पुढारी ऑनलाईन त्‍याची हमी देत नाही)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT