पुढारी ऑनलाईन डेस्क : लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो, शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो… व्हेलंटाईन विकमधील ५ वा दिवस म्हणजेच १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगामध्ये ‘हग डे’ साजरा केला जातो, पण मिठी मारण्याचे फायदे फक्त भावनिकच नाहीत तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. यामुळे आनंद आणि आत्मीयतेची भावना वाढवतो. तसेच आपल्या प्रियजनांमध्ये नाते दृढ करण्यात मदत करतो.
संशोधनानुसार, मिठी मारल्याने शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा आनंद हार्मोन स्रवतो, जो तणाव आणि चिंता कमी करून मन शांत ठेवतो. तसेच, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नियमित मिठी मारल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, परिणामी शरीर आजारांपासून सुरक्षित राहते. मिठीमुळे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होते. प्रियजनांच्या मिठीमुळे नाती अधिक दृढ होतात आणि परस्परांमध्ये विश्वास वाढतो. झोप न लागण्याची समस्या असलेल्या व्यक्तींना मिठीमुळे शांत आणि गाढ झोप येते, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात.