सोशल मीडियाने त्रस्त आहात; आता गैरवापराला घाला आळा pudhari photo
कस्तुरी

Social Media : सोशल मीडियाने त्रस्त आहात; गैरवापराला घाला आळा

पुढारी वृत्तसेवा

हल्ली वर्तमानपत्र किंवा बातम्यांच्या वाहिन्यांवर मोबाईल, इंटरनेट अथवा सोशल मीडियाचा वापर करून दिल्या जाणार्‍या त्रासाबद्दलच्या बातम्या वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतात. मोबाईल, इंटरनेट अथवा सोशल मीडियाचा गैरवापर करून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंसेचं प्रमाण वाढलं असल्याचंही अनेक सामाजिक अभ्यासातून पुढे येतंय. त्या पार्श्वभूमीवर अशा त्रासापासून स्वत:ला दूर कसं ठेवायचं, वाचवायचं कसं, असा त्रास झालाच तर कोणती पावलं उचलायची याविषयी पुढे नोंदवलेल्या गोष्टी उपयोगाच्या ठरू शकतात.

एखादी व्यक्ती इच्छा नसताना चॅट करत असेल तर

व्हॉटस् अ‍ॅप, ई-मेल अथवा फेसबुकसारख्या माध्यमांद्वारे कुणी तुमची इच्छा नसताना चॅट करत असेल, तर त्या व्यक्तीला ब्लॉक करा. अशा माध्यमातून कुणी तुम्हाला अश्लील संदेश, फोटो, व्हिडीओ पाठवत असेल तर सायबर क्राईम विभागात तक्रार करा. अशा व्यक्तींना आपल्या पेजवरून, संपर्क यादीतून काढून टाका. आपल्या कोणत्याही अकाऊंटचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. अपरिचित व्यक्तीला ‘फ्रेंड लिस्ट’शी जोडू नका. तुमचे एखाद्या व्यक्तीकडे खासगी फोटो, व्हिडीओ असतील आणि त्यासाठी ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तर विश्वासातल्या व्यक्तीला सांगा आणि पोलिसात तक्रार करा.

आपल्या वैयक्तिक/खासगी जीवनातील क्षणांचा दुरुपयोग होणार नाही यासाठी सावध राहा. आपला लॅपटॉप, कॉम्प्युटर कोणालाही देताना आपली वैयक्तिक/खासगी माहिती लॉक करा. तुमच्यासोबत काहीही चुकीचं घडलंय/घडतंय असं लक्षात आल्यास ताबडतोब मदत घ्या, पोलिसांत तक्रार करा.

त्रास देणार्‍या व्यक्तींना घाबरू नका आणि गप्पही बसू नका. आपला मोबाईल कोणालाही वापरायला देऊ नका. आपला आणि इतरांचा खासगीपणा जपणं, हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं झालं आहे, हे सदैव लक्षात असू द्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT