कस्तुरी

डीजे पार्टीत भेटा अभिनेत्री स्मिता जयकरांना : कस्तुरीचा महिला महोत्सव सुरू

Pudhari News

सातारा : प्रतिनिधी

रोजच्या जबाबदार्‍या आणि धकाधकीच्या जीवनशैलीतून वेळ काढून एक संध्याकाळ धम्माल मस्तीत  साजरी करण्यासाठी चला कस्तुरींनो   डीजे पार्टीला. दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे महिला दिन महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले  असून  बुधवार   दि. 6 मार्च रोजी होणार्‍या महिलांच्या डीजे पार्टीमध्ये सिने कलाकार स्मिता जयकर यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. तसेच  विविध स्पर्धेतून बक्षीसांसह लकी ड्रॉमधून आकर्षक भेटवस्तूही जिंकता येणार आहेत.

दै.'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधून महिला दिन महोत्सवांतर्गत    विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  कस्तुरी क्लबतर्फे 'झुंबा एरोबिक्स' हे डान्सचे वर्कशॉप सुरु असून महिलांचा सहभाग वाढत आहे. यामध्ये एबीसीडी डान्स स्टुडिओमार्फत महिलांना डान्स व एरोबिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. डीजे पार्टीत रेट्रो स्टाईल लुक स्पर्धा तसेच अभिनय स्पर्धा घेतली जाईल. अभिनय स्पर्धेमध्ये जुन्या काळातील सिने अभिनेत्री किंवा अभिनेता यांची वेशभूषा करुन त्यांचा प्रसिध्द डायलॉग स्पर्धकांनी सादर करायचा आहे.कार्यक्रमासाठी येणार्‍या सर्वांनी शक्य असेल तर रेट्रो स्टाईल पोषाख करुन यावे. वेस्टर्न ड्रेस किंवा रेड, ब्ल्यू, ब्लॅक रंगातील वन पीस परिधान करुन आला तर कार्यक्रमाची रंगत आणखी  वाढणार आहे. डीजे पार्टीसाठी सर्व महिलांना मोफत प्रवेश आहे.

सध्याचे युग संगणकाचे असल्याने  महिला डिजिटलायझेशनमध्ये मागे राहता कामा नयेत, यासाठी  दै.'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे  दि. 8 ते 11 मार्च या कालावधीत 'डिजिटल वुमन' ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत महिलांना गुगल पे, गुगल ड्राईव्ह, गुगल मॅप (डायरेक्शन), ऑनलाईन वॉटर अ‍ॅण्ड लाईट बील, मोबाईल रिचार्ज, ऑनलाईन मुव्ही शो बुकींग, कॅब बुकिंग, डिश  रिचार्ज, ऑनलाईन शॉपिंग इत्यादी गोेेेष्टींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी महिला व युवतींकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल असणे आवश्यक आहे. कस्तुरी सदस्यांसाठी 150 रुपये व इतर महिलांसाठी 200 रुपये प्रवेश फी असून सहभागी सर्व महिलांना 500 रुपयांचे गीफ्ट कूपन दिले जाणार आहे. लकी ड्रॉमधून सोन्याची नथ व चांदीचे पैजन बक्षीस दिले जाणार आहे.  या कार्यशाळेसाठी एक्सेल कॉम्प्युटर्स,  रोहन हाईटस् पेंढारकर  हॉस्पिटल शेजारी, पोवई नाका सातारा येथे 9921088811 संपर्क साधावा, असे आवाहन दै.'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले  आहे.

यावेळी दरमहा भाग्यवान सोडतीमधून उपस्थित सभासदांना नागोरी ज्वेलर्स, श्रीगणेश गोल्ड, मेकओव्हर ब्युटीपार्लर, शुभम ज्वेलर्स, साई कलेक्शन, मंथन बॅग्ज, कणक ब्युटीपार्लर, प्रज्ञा माने यांच्याकडून टपरवेअर भेटवस्तू, श्रावणी क्लासेस, नीशा बुटिक, पद्मनाभ ज्वेलर्स यांच्यामार्फत भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. लकी ड्रॉ कूपन जाहिरातीमध्ये प्रसिध्द करण्यात येईल.

असा आहे महिला महोत्सव

 

दि. 5 मार्चपर्यंत  सायं.4 ते 6 वा. –  झुंबा व एरोबिक्स डान्स 

स्थळ: एबीसीडी डान्स स्टुडिओ, शालिनी मल्टिपर्पज हॉल, राजवाडा, सातारा.   संपर्क: अक्षय सावंत 9881733266.

 दि. 6 रोजी सायंकाळी 4 वाजता  –  डीजे पार्टी

स्थळ: हॉटेल राधिका पॅलेस, राधिका रोड  सातारा.

संपर्क : भक्ती झणझणे -9922249914.

 दि. 8 ते 11 मार्च  – डिजिटल वुमन कार्यशाळा

 स्थळ: एक्सेल कॉम्प्युटर्स,  रोहन हाईटस् पेंढारकर हॉस्पिटल शेजारी ,  पोवई नाका सातारा.  संपर्क: 9921088811.

कार्यक्रमाचे प्रायोजक

या कार्यक्रमाचे प्रायोजक ब्लॉसम स्कूल, सातारा असून या स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात 2 अल्पावधीतच नावलौकिक  मिळवला आहे. लव्ह जॉय पीस हे ब्रीद वाक्य  घेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.   सहप्रायोजक एक्सेल कॉम्प्युटर्स असून त्यांच्यामार्फत महिला दिनानिमित्त  डिजीटल वुमन ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.  डीजे पार्टीसाठी व्हेन्यू अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल राधिका पॅलेस आहेत. दर्जेदार गुणवत्ता व उत्तम ग्राहक सेवा यासाठी सातारा शहरातील  शुद्ध शाकाहारी म्हणून राधिका पॅलेसची ओळख आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT