कस्तुरी

मुलांबरोबरचं शॉपिंग, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे

अनुराधा कोरवी

अनेकदा मुलांना घेऊन शॉपिंगला जावं लागतं. अशावेळी मुले एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरतात आणि तो पूर्ण झाला नाही की तो रडायला लागतात. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. रिकी शॉपिगला गेली त्यावेळी तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता. तिच्या मुलाने स्नॅक्स पाहिल्यानंतर त्याने त्यासाठी हट्ट धरला.

रिंकीने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याने भोकाड पसरले, नंतर रिंकीने एका मॉलमध्ये एक नेकलेस पाहिला. त्यावेळीही त्याने तो खरेदी करण्यासाठी आईकडे हट्ट धरला. मुले असा हट्ट करत असतील तर त्यांची समजूत काढण्यासाठी उपाय कोणते, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या मुलांना घेऊन शॉपिंगला जाल त्यावेळी त्याला अशा गोष्टी समजावून सांगाव्यात. त्याचप्रमाणे ज्यावेळी बाजारात फारशी गर्दी नसेल अशावेळी मुलांना घेऊन शॉपिंगला जावे. गर्दी असेल तर तेथे मुलांची समजूत काढणे अवघड होते. यासाठी मुलांना शॉपिंगला घेऊन जाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आपलं शॉपिंग शांततेत व्हावे, असे प्रत्येक आईला वाटते. आपल्याला शॉपिंगदरम्यान आपल्या मुलांशी अतिशय संयमाने वागावे लागेल. आपले मूल घरात असेल आणि आपली आई शॉपिंगला गेली आहे आणि ती घरी आल्यानंतर आपल्यासाठी एक गिफ्ट घेऊन येणार आहे. हे त्याला माहीत असेल तर ते मिळाल्यानंतर तो खूश होऊन जाईल.

आपला मुलगा शॉपिंगच्या वेळी आपल्याबरोबर असला आणि त्याचे वागणे योग्य नसले तर तुला घरी गेल्यानंतर कोणतेही गिफ्ट मिळणार नाही, असे त्याला सांगा. मूल खूप छोटे असेल तर त्याला शॉपिंग कार्ट किंवा स्ट्रोलरमधून घेऊन जावे; पण मूल त्याच्या जबाबदान्या सांभाळण्याइतके मोठे असेल तर मला शॉपिंगसाठी मदत कर, असे त्याला सांगावे. त्यामुळे आपल्याला मदत करणे शिकू शकेल.

मुलांना घेऊन शॉपिंगला जात असाल तर आपण त्याच्याबरोबर एखादा गेम खेळताना ज्याप्रमाणे आनंद घेतो तसाच शॉपिंगच्या वेळीही घ्यावा. त्याला काही कोडी घालावीत. स्टोअरमधून दोन वस्तू घेऊन त्यांची नावे त्याला विचारावीत. त्याचप्रमाणे या दोन गोष्टीमध्ये काय साम्य आहे, असेही त्याला विचारू शकता. तरीही आपले मूल शॉपिंगच्या वेळी त्रास देत असेल तर शॉपिंगला जाण्याचे प्रमाण कमी करावे किंवा मूल शाळेत गेले असेल यावेळी शॉपिंगला जावे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT