कस्तुरी

झटपट हेल्दी टिफिन, ब्रेकफास्ट रेसिपीज्

Pudhari News

कोल्हापूर ः 

दै. 'पुढारी' कस्तुरी क्‍लब नेहमीच नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. आताही एकदम वेगळी आणि नवीन अशी कार्यशाळा महिलांसाठी आयोजित करीत आहोत. नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांची आवराआवर, सकाळची धावपळ, त्यात डब्याची गडबड यात रोज मुलांना नवीन काय पदार्थ करून द्यायचा? तसाच तो मुलांच्या आवडीचा आणि त्यांच्या आरोग्यासाठी हेल्दीही असायला हवा; असे प्रत्येक आईला वाटते. 

मग अशावेळी झटपट कमी वेळेत बनविता येतील आणि मुलांना आवडतील असे पदार्थ मुलांना बनवून दिले आणि नोकरी करणार्‍या महिलांना कमी वेळेत  घरच्यांच्या नाष्ट्याचीही झटपट सोय करता आली तर त्यांनाही खूप आनंद होईल. आणि म्हणूनच कस्तुरी क्‍लबतर्फे 'झटपट हेल्दी टिफीन आणि ब्रेकफास्ट' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आपण बाजारातनू नेहमी झटपट तयार होणारे रेडी टू इट असे अनेक कंपन्यांचे पॅकेटस् आणून त्याचे विविध पदार्थ बनवितो. हेच 'रेडी टू इट मिक्स' घरच्या घरी बनवून ठेवता आले तर ते कमी खर्चिक आणि आवश्यकतेनुसार केव्हाही पटकन वापरता येतील. या कार्यशाळेमध्ये डोसा मिक्स, पावभाजी मिक्स, मूगभजी मिक्स, आप्पे मिक्स, थालीपीठ मिक्स, खमण ढोकळा मिक्स, पोहे/उपमा मिक्स यासह गुलाब जामून मिक्स, बासुंदी मिक्स, खीर मिक्स, केक मिक्स हे इंडियन स्वीट मिक्सेस  करून दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर या मिक्सेसपासून  पदार्थ तयार करून दाखविले जाणार आहेत. 

उपस्थित प्रत्येकास या पदार्थांच्या प्रिंटेंड नोट दिल्या जाणार आहेत. ही कार्यशाळा केतकी सरनाईक घेणार आहेत. कार्यशाळेसाठी कस्तुरी क्‍लब सभासदांना 300 तर इतरांसाठी 400 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे. 

कार्यशाळा शनिवार, दि. 22 जून रोजी दु. 1.30 वाजता हॉटेल केट्री, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे होणार असून, नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क – 8805007724, 8805024242, 0231- 6625943.

या मिक्सेसचे फायदे…

*     पदार्थ झटपट तयार होतात.

*     खर्च कमी लागतो.

*     नो प्रिझर्व्हेटिव्ह

*     5 ते 6 महिने फ्रिजमध्ये, 

    2 महिने फ्रिजबाहेर चांगली राहते

*     जॉब करणार्‍या 

    महिलांसाठीही सोयीस्कर

*     या मिक्सेसचे पाकीट 

    करून घरगुती बिझनेस करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT