कोल्हापूर : प्रतिनिधी
रोजच्या जबाबदार्या आणि रोजचीच कामे यातून एक संध्याकाळ एकदम हटके साजरी करण्यासाठी चला जाऊ कस्तुरी क्लब आयोजित बॉलीवूड थीम डी.जे. पार्टीमध्ये. धमाल, मस्ती आणि बॉलीवूड बिटस्वर थिरकायचंय… होय दैनिक 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने कस्तुरी सभासदांसाठी खास बॉलीवूड स्टाईल डान्स फ्लोअर डी.जे. पार्टीचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दि. 2 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता मधुसुदन हॉल, हॉटेल पॅव्हेेलियन, बसंत-बहार रोड, कोल्हापूर येथे होणार आहे. शनिवारची संध्याकाळ आपल्या आवडीनुसार मनसोक्त जगण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा. तुमच्या सोबत टोमॅटो एफ.एम.चा डी.जे. बिटस् आणि टोमॅटो एफ.एम.वरील आर.जे. उपस्थित राहून कार्यक्रम अधिक आकर्षक करणार आहेत.
विशेष म्हणजे पार्टीत सहभागी होताना तुम्हीही बॉलीवूड कलाकारांच्या स्टाईलचा आकर्षक पेहराव करून सहभागी होणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एव्हर लव्ह कॉस्मेेटिक अँड ब्यूटी केअर प्रा. लिमिटेडचे बाली हेअर ऑईल हे असून केसांच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त असे हे ऑईल केस गळणेही एकदम कमी करते तसेच यातील अनेक पोषक तत्त्वांमुळे केसांची मुळे मजबूत होऊन याच्या नियमित वापराने केस दाट व लांब होतात. या पार्टीमध्ये बॉलीवूड स्टाईल सर्व सजावटअसणार आहे. जिथे तुम्ही आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याची मजा लुटू शकता. चला तर मग लागा तयारीला.अधिक माहितीसाठी संपर्क – टोमॅटो एफ.एम. कार्यालय, 8805007724, 8805024242. प्रवेश फक्त कस्तुरी सभासदांसाठीच.
धमाल स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे
1) उत्कृष्ट अभिनय : 1990 मधील कोणत्याही अभिनेत्रीची वेशभूषा करून तिच्या कोणत्याही चित्रपटातील डायलॉग सादर करावयाचा आहे.
2) उत्कृष्ट कस्तुरी जोडी : कोणत्याही बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि अभिनेता यांची वेशभूषा करून त्यांच्या एखाद्या चित्रपटातील एक क्षण (सिन) सादर करावयाचा आहे.
या दोन्ही स्पर्धांतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अगोदर नावनोंदणी आवश्यक. टीप : कार्यक्रमस्थळी अचानक नावे नोंदवून घेतली जाणार नाहीत.