आपल्या घरात जरा डोकावून बघा बरं...
किती किती आणि कुठलं कुठलं सामान साठवून ठेवलंय आपण? माळे, कपाटं, लहान-मोठे कप्पे, ड्रॉवर, ठेवणीतले खण, ट्रॉल्या, बंगा अशा कितीतरी जागा असतात काही घरांमध्ये, ज्या अक्षरशः खचाखच भरलेल्या असतात. कपडे, वस्तू, भांडीकुंडी, पिशव्या, सजावटीच्या वस्तू, गिफ्ट आयटम, चादरी-अभ्रे. कशाचाच साठा करू नये, असं थोडंच आहे? अर्थात साठा म्हणजे रद्दीच्या दुकानातल्यासारखा नाही बरं; व्यवस्थित सांभाळलेला संग्रह असावा पुस्तकांचा प्रत्येक घरात ! पण, तो क्वचितच आढळतो हल्ली घराघरात. असो! पण, किमान इतर वस्तूंच्या साठवणुकीमागचं कारण तरी आपल्याला ठाऊक असावं.
रजया-दुलया, प्रवासाला आणि शॉपिंगला न्यायच्या बँगा... एक म्हणू नका दोन म्हणू नका; असंख्य गोष्टी असतात या साठवणीत. काहींचे तर फ्रीज आणि स्वयंपाकघरातले खणही या साठवणीला अपवाद नसतात.
दिवस आणि दिवस, महिन्यांमागून महिने या साठवणीकडे कुणी पाहात नाही. ते हवंय, नकोय, लागणार आहे किंवा नाही याविषयी कुणी पडताळा घेत नाही. ना ते वापरात येतं, ना निगुतीने जपलं जातं. फक्त साठाच साठा होत राहतो... घरात वावरत असलेल्या व्यक्तींच्या नजरांच्या पल्याड!
कशाचाच साठा करू नये, असं थोडंच आहे? पुस्तकांचा साठा करावा की! अर्थात साठा म्हणजे रद्दीच्या दुकानातल्या सारखा नाही बरं; व्यवस्थित सांभाळलेला संग्रह असावा पुस्तकांचा प्रत्येक घरात! पण तो क्वचितच आढळतो हल्ली घराघरात. असो! पण, किमान इतर वस्तूंच्या साठवणुकीमागचं कारण तरी आपल्याला ठाऊक असावं.
योग्य वेळी ते आठवून वापरण्याचं कौशल्य तरी अंगीकारावं. किमान सोडवत नाही म्हणून किंवा टाकवत नाही म्हणून साठवायचं असं तरी होऊ नये. किमान त्या साठवून ठेवलेल्या वस्तू कुणा गरजवंताला योग्य वेळी योग्य पद्धतीने द्याव्यात तरी। जर उपयोग केला गेला नाही, तर नुसत्या भरमसाट साठ्याची किंमत शून्यच! मग भलेही तो साठा मनातल्या सद्विचारांचा असेल वा घरात खचाखच भरून ठेवलेल्या वस्तूंचा!