Crop Top Fashion 
कस्तुरी

Crop Top Fashion: तरूणींमध्ये स्टायलिश क्रॉप टॉपची क्रेझ

मोहन कारंडे

चित्रपटातील फॅशनची तरुणींवर भुरळ पडते. बहुतेकवेळा अभिनेत्री करतात ती फॅशन कॉपी केली जाते. फॅशनची चलती बहुतांश वेळा चित्रटांमधूनच आलेली दिसते आणि त्याची कॉपी करूनच आपण मुली स्टायलिश होतो. हल्ली बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये क्रॉप टॉपची क्रेझ आहे. त्यामुळे तरुणी जरा मादक दिसतात. क्रॉप टॉप जीन्स वर, साडीवर घालू शकता किंवा स्कर्टवरही (Crop Top Fashion) घालू शकता. क्रॉप टॉपमुळे एकूणच लूक बदलून जातो.

बॉलीवूडमधील अभिनेत्री लेहंगा, स्कर्ट किंवा प्लाझो यावर क्रॉप टॉप घालत होत्या त्यातून जरा पारंपरिक लूक देण्याचा प्रयत्न करीत होत्या. हल्ली तर त्या पाश्चिमात्य कपड्यांवरही क्रॉप टॉप वापरताना दिसतात. कारण क्रॉप टॉपमध्ये सौंदर्य अधिक खुलून (Crop Top Fashion)दिसते.

Crop Top Fashion

साडीवर क्रॉप टॉप : क्रॉप टॉपवर साडी नेसायची हे ऐकायला जरा विचित्र वाटत असले तरीही एक वेगळाच लूक यामुळे मिळतो. साडीवर स्लीव्हलेस क्रॉप टॉप हा लूक आधुनिकता जपत पारंपरिक लूक देणारा आहे. त्याबरोबर लांब दोरीमध्ये मोठेसे पेडंट घालून आकर्षक लूक मिळवू शकता.

स्कर्ट किंवा लेहंगा यांच्याबरोबर फ्यूजन : क्रॉप टॉप लॉग स्कर्टबरोबर किंवा डिझायनर लेहंगा त्याबरोबरही घालू शकतो. त्याच्यावर क्रोशियाचे काम असलेला श्रग खूप सुंदर दिसतो. मोठ्या आकाराचे कानातले घातले की कामच झाले.

जीन्स बरोबर : जीन्स बरोबर क्रॉप टॉप घालणे सध्या इन थिंग किंवा चलतीत आहे. जीन्स, क्रॉप टॉप आणि त्यावर जॅकेट घालणे ही नवी थीम आहे. या लूकमध्ये फार अ‍ॅक्सेसरीज वापरू नयेत. क्रॉस बॅग घेऊ शकतो. नाहीतर खूप बटबटीत दिसायला होते. तसेच फिकट रंगाची जीन्स किंवा पँट असेल तर क्रॉप टॉप मात्र गडद रंगाचा वापरावा.

काही युक्त्या पाहूया : आधुनिक आणि स्टायलिश असा लूक हवा असेल तर डेनिम रॅप्ड जीन्सबरोबर स्ट्राईप्स असलेला क्रॉप टॉप वापरा.
फ्लेअर्ड पँट बरोबरही क्रॉप टॉप स्टायलिश दिसतो. बॉलीवूडच्या अभिनेत्रींसारखे सुंदर पण स्टायलिश दिसण्यासाठी स्कर्ट बरोबर क्रॉप टॉप घालून पहा.

शॉर्टस घातली तर त्यावरही क्रॉप टॉप घालून जरा मादकपणा मिरवू शकता. शॉर्टस वर क्रॉप टॉप घातल्यास आपण सुंदर तर दिसतोच, पण आकर्षक दिसू शकतो.

– अपर्णा देवकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT