कस्तुरी

फॉईल पेपरचा वेगळा वापर

Shambhuraj Pachindre
  • अ‍ॅल्युमिनिअम फॉईलचा वापर अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र, याच फॉईलचा थोडा वेगळा वापरही करता येतो. किचनमधील ट्रॉली किंवा कपाट यांच्या कडेला अ‍ॅल्युमिनिअम फॉईल लावू शकता. त्यामुळे तेलाचे डाग पडणार नाहीत.
  • ग्रिलची स्वच्छता करण्यासाठीही अल्युमिनिअम फॉईलचा वापर करता येतो. त्यामुळे ग्रिलवरील धूळ सहजपणे साफ होईल.
  • आपल्या आवडीचा पिझ्झा पुन्हा गरम करायचा तर तो चिवट होतो किंवा करपतो. अशावेळी अ‍ॅल्युमिनिअम फॉईलची मदत घ्या.
  • पिझ्झा फॉईलमध्ये ठेवून गरम करा. त्यामुळे तो जळणार नाही.
  • एखादे भांडे जळाले असेल आणि स्टीलची घासणी किंवा स्क्रब नसेल तर अ‍ॅल्युमिनिअम फॉईलचा वापर करून जळलेले भांडे स्वच्छ करू शकता.
  • बागेतल्या फळांवर पक्षी येऊन बसतात. या पक्ष्यांपासून फळांचा बचाव करायचा असेल तर अल्युमिनिअम फॉईल कातरून झाडावर टांगावे. असे केल्यामुळे पक्षी घाबरतात. परिणामी, फळांचे नुकसानही होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT