Guava File Photo
फीचर्स

How to identify Desi Guava: पेरू खरेदी करताना देशी आहे की हायब्रिड कसं ओळखायचं?

तुम्हालाही अस्सल देशी पेरू हवा असेल, तर तो ओळखायचा कसा? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स.

पुढारी वृत्तसेवा

How to identify Desi Guava:

सध्या बाजारात इतर फळांप्रमाणेच पेरूच्याही दोन जाती पाहायला मिळतात, देशी आणि हायब्रिड. अनेकदा ग्राहक देशी पेरू समजून हायब्रिड पेरू खरेदी करून फसतात. हायब्रिड पेरू खाणे आरोग्यासाठी हानिकारक नसले, तरी अस्सल देशी पेरूची चव आणि सुगंध काही वेगळाच असतो. तुम्हालाही अस्सल देशी पेरू हवा असेल, तर तो ओळखायचा कसा? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स.

पेरू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. याशिवाय, खोकला किंवा कफाचा त्रास असल्यास पेरू भाजून खाणे आरोग्यदायी मानले जाते.

हायब्रिड पेरू म्हणजे काय?

हायब्रिड पेरू तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या जातींच्या वनस्पतींचे संकर केले जाते. हायब्रिड पेरू दिसायला आकर्षक असले, तरी त्यांची चव, पोत आणि सुगंध देशी पेरूहून पूर्णपणे भिन्न असतो. त्यामुळे देशी पेरूची आवड असणाऱ्यांना हायब्रिड पेरू फारसा आवडत नाही.

देशी आणि हायब्रिड पेरूमधील फरक कसा ओळखायचा?

आकारावरून ओळखा:

हायब्रिड पेरू आकाराने मोठे, गोल आणि चमकदार असतात. त्यांची साल थोडी खडबडीत असते. याउलट देशी पेरू आकाराने थोडे लहान आणि अनियमित असतात. देशी पेरूमध्ये बिया जास्त आणि कडक असतात, तर हायब्रिडमध्ये बिया कमी आणि मऊ असतात.

रंग आणि आतील भाग:

हायब्रिड पेरूची साल नेहमी हिरवीच राहते; ती पिवळी पडत नाही. देशी पेरू मात्र पिकल्यावर हिरव्याचे पिवळे होतात. याशिवाय देशी पेरू आतून पांढरे, गुलाबी किंवा लालसर रंगाचे असू शकतात, तर हायब्रिड पेरू आतून बहुदा पांढरेच असतात.

चव आणि मऊपणा:

हायब्रिड पेरू फक्त गोड असतात, त्यात आंबटपणा नसतो. मात्र देशी पेरूमध्ये गोडव्यासोबत एक हलकी नैसर्गिक आंबट-गोड चव असते. देशी पेरू हाताने दाबल्यास थोडे मऊ वाटतात, तर हायब्रिड पेरू खूप कडक असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT